18 सप्टेंबरला एशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध हाँग काँग यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात भारताने केवळ 26 धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकत भारताने पुढच्या फेरीत प्रवेश केला.
भारताचा पुढचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 19 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाला वेळ मिळाला आहे तो केवळ 16 तासांचा.
हॉंगकॉंग विरूध्दचा सामना रात्री 1 वाजता संपला आणि पाकिस्तान विरूध्दचा सामना सायंकाळी 5 ला सुरू होणार असून त्यामध्ये अंतर केवळ 16 तासांचे उरले आहे.
सलग दोन दिवसात दोन सामने खेळण्याची भारतीय संघाची ही पहिलीची वेळ नसून याआधी भारतीय संघ 10 जानेवारी 2010 साली श्रीलंकेविरूध्द वनडे सामना खेळला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 जानेवारी 2010 ला बांग्लादेश विरूध्द वनडे सामना खेळलेला आहे.
2010 साली भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील वनडे तिरंगी मालिका झाली होती त्यावेळी भारताला सलग दोन सामने खेळावे लागले होते. या दोन्ही सामन्यात भारताने श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यावर अनुक्रमे 8 आणि 6 विकेटने विजय मिळवला होता.
तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारतावर 4 विकेटने विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–एशिया कप २०१८: भारताच्या या विक्रमाशी बरोबरी करण्याची पाकिस्तानला संधी
-एशिया कप २०१८: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी इम्रान खान लावणार हजेरी
-टॉप ५: शिखर धवनने दमदार शतक करत केले हे खास विक्रम