दक्षिण आफ्रिकेत कोविड-१९ चा नवा व्हेरिएंट, ऑमिक्रॉन व्हेरिएंट सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अगदी क्रिडा क्षेत्रालाही याचा फटका सहन करावा लागला आहे. ओमिक्रॉनमुळे नुकतेच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सामने स्थगित केले आहेत. यानंतर आता भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही या महामारीचा परिणाम झाला आहे.
या महामारीच्या संकटातही भारताचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. परंतु या दौऱ्यातील टी२० सामन्यांच्या तारखा मात्र काही दिवसांनी पुढे ढकलल्या गेल्या आहेत. शनिवारी (०४ डिसेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.
न्यूज इजन्सी एएनआयशी बोलताना जय शहा म्हणाले की, “भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ सामन्यांची कसोटी मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळेल. परंतु त्यानंतरची ४ सामन्यांची टी२० मालिका मात्र अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.”
India to tour South Africa for three Tests and three ODIS, T20Is to be played later: BCCI secretary Jay Shah to ANI pic.twitter.com/2DkPVEDGzR
— ANI (@ANI) December 4, 2021
भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिका सध्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार १७ डिसेंबरपासून सुरू होणार होती. व २६ जानेवारी रोजी चौथ्या टी२० सामन्याने हा दौरा संपणार होता. परंतु आता बीसीसीआयने केलेल्या घोषनेनंतर कसोटी आणि वनडे सामन्यांच्या तारखांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. तर टी२० मालिकेसंदर्भातील निर्णय येत्या काळात घेतला जाईल.
यापूर्वी रद्द झालाय दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
यापूर्वीही मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील मालिका संकटात सापडल्या होत्या. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. परंतु त्यांना एकही सामना न खेळता मायदेशी परताने लागले होते. त्यावेळी ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे होणार होता. परंतु पावसामुळे एकही चेंडू न फेकता हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर भारतातील कोरोनाची प्रकरणे वाढल्याने उर्वरित २ सामने प्रेक्षकांविना रिकाम्या मैदानात खेळवण्याचे ठरवले गेले. परंतु कोरोनाचा वेगाने वाढता प्रादुर्भाव पाहता अखेर ही मालिका रद्द केली गेली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsNZ, 2nd Test, 2nd Day Live: दीडशतकी खेळी करुन मयंक बाद, एजाज पटेलचा भारताला ७ वा धक्का
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
श्रीलंकेच्या वेस्ट इंडिजवरील विजयाने पुन्हा एकदा भारताचे नुकसान, पाहा WTC गुणतालिकेतील सद्यस्थिती