fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पहिल्या कसोटी सामन्यात या संघाने जिंकली नाणेफेक, अशी आहे टीम इंडिया

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (1 आॅगस्ट) सुरु होत असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना आज एजबॅस्टन मैदानावर होत आहे.

भारतीय संघ या मालिकेची सुरुवात कसोटी क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा संघ म्हणून करत आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील संघात कर्णधार विराट कोहलीने पुनरागमन केले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे टीम इंडिया- 

विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, केएल राहुल, अजिंक्य रहाणे,  दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा.

इंग्लंड विरुद्ध भारत कधी होणार आहे पहिला कसोटी सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना 1 आॅगस्ट 2018 ला होणार आहे.

कोठे होईल इंग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना?

इंग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर होणार आहे.

किती वाजता सुरु होईल इंग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना?

भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

सोनी टेन 3,सोनी टेन 3 एचडी, सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना इंग्लंड विरुद्ध भारत  पहिला कसोटी सामना पाहता येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?

sonyliv.com या वेबसाईटवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना ऑनलाइन पाहता येईल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ५- इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत होणार हे ५ खास विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावा करणारा खेळाडूच झालाय मुलाचा कोच

संपुर्ण वेळापत्रक- टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक घोषीत

You might also like