भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबर रोजी वनडे मालिकेने होईल. या दौऱ्यावर अनेक युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असेल. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि समालोचक इयान चॅपल यांनी पृथ्वी शॉचे कौतुक केले आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फो या क्रिकेट वेबसाइटसाठी लिहिलेल्या स्तंभात चॅपल यांनी तीन युवा खेळाडूंचे कौतुक केले आहे. या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे युवा खेळाडू विल पुकोवस्कि, कॅमेरून ग्रीन आणि भारताचा युवा प्रतिभावान खेळाडू पृथ्वी शॉ यांचा समावेश आहे. या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असेल असेही त्यानी म्हटले आहे.
शॉवर असेल नजर
चॅपेल यांनी शॉबद्दल बोलताना म्हटले आहे की ‘शॉने वयाच्या १८ व्या वर्षी कसोटीत पदार्पण केले होते. त्याच्या फलंदाजीने त्याला काही गोष्टींवर मेहनत करण्याची गरज असल्याचे संकेत दिले आहेत. दुर्दैवाने तो मागील ऑस्ट्रेलिया दौरा घोट्याच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याने न्यूझीलंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली होती.’
त्या काळात युवा क्रिकेटपटुंना दिली जायची संधी
चॅपल यांनी या स्तंभात लिहिले की, “एक काळ असा होता जेव्हा युवा क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियन संघात संधी दिली जायची. 1928 ते 1930 दरम्यान 20 वर्षीय डॉन ब्रॅडमन आणि 19 वर्षीय युवा क्रिकेटपटू आर्ची जॅक्सन आणि स्टॅन मॅककेब यांचा संघात समावेश होता. या तीनही खेळाडूंना 1930 मधील इंग्लंड दौर्यावर सर्वोत्कृष्ट फलंदाजीचा भाग मानले होते.”
ऑस्ट्रेलियामध्ये बदलत आहे ट्रेंड
चॅपल यांनी पुढे लिहिले आहे की “अलिकडच्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघासारखेच परिपक्व क्रिकेटपटूंना संधी दिली आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे माइक हसी. त्याला वयाच्या 30 व्या वर्षी 2005 मध्ये पहिली कसोटी खेळण्याची संधी मिळाली.
युवा क्रिकेटपटूंना मिळत आहे संधी
आता ऑस्ट्रेलियाने युवा क्रिकेटपटूंना पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या संघांविरुद्ध संधी देणे सुरू केले आहे. त्याअंतर्गत विल पुकोवस्कि आणि कॅमेरून ग्रीन यांना संधी देण्यात आली आहे.
ग्रीन, पुकोवस्की यांचे केले कौतुक
चॅपल यांनी या दोन क्रिकेटपटूंचे कौतुक करताना लिहिले की, “22 वर्षीय फलंदाज पुकोवस्की आणि 21 वर्षीय अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांनी मोठे डाव खेळले आहेत.एवढेच नव्हे तर पुकोवस्कीने शिल्ड हंगामात दोन दुहेरी शतके ठोकली आहेत . सलामीला तो डेविड वॉर्नरचा चांगला साथीदार असल्याचे सिद्ध होऊ शकते.”
ग्रीनने न्यू साउथ वेल्सच्या आक्रमक गोलंदाजीविरुद्ध 197 धावांची खेळी खेळली.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईकडून आयपीएल गाजवलेल्या ऋतुराज गायकवाडचा पुण्यात येताच झाला मोठा सन्मान
दिग्गजाने निवडला सर्वोत्कृष्ट आयपीएल संघ; विराटला डच्चू तर सूर्यकुमार यादवला दिले ‘हे’ स्थान
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवानंतर सेहवागने घेतली फिरकी, म्हणाला ‘काकांच्या कॉमेडीची आठवण येईल’
ट्रेंडिंग लेख –
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
जोडी नंबर वन! सचिन-द्रविड जोडीने २१ वर्षांपूर्वी ऐतिहासिक भागीदारी करत रचला होता इतिहास
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?