भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए संघातील पहिला सराव सामना 6 ते 8 डिसेंबर यादरम्यान होणार आहे. या सराव सामन्यात पुढील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आपल्या कसोटी तज्ज्ञ खेळाडूंचे आकलन करतील. सिडनीच्या ओव्हल मैदानात होणाऱ्या या सराव सामन्यात हजेरी लावण्याची परवानगी प्रेक्षकांना नसेल, परंतु ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ या सामन्याचे लाईव्ह प्रसारण करणार आहे.
क्रिकेट डॉट कॉम एयू आणि सीए लाईव्ह ऍपवर या सामन्यातील प्रत्येक चेंडूचे लाईव्ह स्ट्रिमिंग होईल जे की ऑस्ट्रेलिया शिवाय जगाच्या अन्य भागातून पाहिले जावू शकते. फॉक्सटेल आणि कायोही ऑस्ट्रेलियामध्ये या सामन्याचे प्रसारण करतील आणि भारतामध्ये सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्कवर हा सामना पाहता येवू शकते.
ऑस्ट्रेलिया निवड समितीने भारत एविरुद्ध पहिल्या सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया ए संघासाठी 13 सदस्यांची निवड केली आहे आणि या संघाचे नेतृत्त्व ट्रेविस हेड याच्याकडे सोपवण्यात आले आहे. हेडच्या नेतृत्त्वाखालील संघात टीम पेन, जो बर्न्सबरोबर कॅमेरॉन ग्रीन हे खेळाडूदेखील सामील असणार आहेत. ज्याला ऑस्ट्रेलिया टी-20 संघातून मुक्त केले आहे.
ऑस्ट्रेलिया ए संघ- ट्रेविस हेड (कर्णधार), जॅक्सन बर्ड, जो बर्न्स, हॅरी कॉन्वे, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरीस, नीक मॅड्डिसन, मिचेल नासेर, टीम पेन, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, मार्क स्टेकेटी, विल सदरलँड.
त्याचबरोबर भारतीय कसोटी संघात सध्या टी-20 मालिकेत खेळत नसलेले खेळाडू सहभागी असणार आहेत.
भारतीय ए संघ- पृथ्वी शॉ, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, आर अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहमद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; ‘हा’ खेळाडू टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता
“त्या खेळाडूला पाहिल्यावर होते राहुल द्रविडची आठवण”
‘…तर तुम्ही कन्कशन सब्स्टिट्यूट घेण्यास पात्र नाही’, भारतीय दिग्गजाची नव्या नियमावर नाराजी
ट्रेंडिंग लेख-
‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?
पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण