ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात शुक्रवारी (४ डिसेंबर) संपन्न झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत आघाडीवर आला आहे. मात्र, या सामन्यादरम्यान एक विवादित घटना घडली होती. भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या हेल्मेटवर चेंडू आदळल्याने, त्याचा कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून फिरकीपटू युझवेंद्र चहलला गोलंदाजी करण्याची परवानगी देण्यात आली होती. या कन्कशन सब्स्टिट्यूट नियमाला भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी विरोध दर्शवला आहे.
रवींद्र जडेजाला झाली होती दुखापत
भारतीय संघ फलंदाजी करत असताना अखेरच्या षटकातील दुसरा चेंडू रवींद्र जडेजाच्या हेल्मेटवर आदळला होता. त्यानंतरही, जडेजाने फलंदाजी करत त्या षटकात दोन चौकार वसूल केले होते. भारताचा डाव संपल्यानंतर जडेजाला चक्कर येऊ लागल्याने, कन्कशन सब्स्टिट्यूट नियमांप्रमाणे भारतीय संघाने सामनाधिकारी डेविड बून यांच्या सहमतीने फिरकीपटू युझवेंद्र चहलला गोलंदाजीसाठी संघात सामील केले.
चहलने गोलंदाजी करताना आपल्या चार षटकात अवघ्या २३ धावा देऊन ऑस्ट्रेलियाचे तीन महत्त्वपूर्ण बळी मिळवले. अखेरीस, ऑस्ट्रेलियाला सामन्यात ११ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. चहलच्या या कामगिरीने एकप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या जखमेवर मीठ चोळले.
सुनील गावसकर यांनी कन्कशन नियमावर नाराजी
कन्कशन सब्स्टिट्यूट या नियमाविषयी नाराजी व्यक्त करताना गावसकर म्हणाले, “मी कन्कशन सब्स्टिट्यूट नियमाच्या काहीसा विरोधात आहे. कदाचित मी जुन्या विचारांचा असल्यामुळे हे असेल. मात्र, माझी ठाम धारणा आहे की, तुम्ही बाउन्सर चेंडू खेळू शकत नसाल आणि चेंडू तुमच्या हेल्मेटवर लागत असेल, तर तुम्ही बदली खेळाडू घेण्यास पात्र नाही. परंतु आता हा नियम आहे आणि सर्व नियमांना धरून झाले असल्याने यात गैर काही नाही.”
भारताला झाला दुहेरी फायदा
‘कन्कशन सब्स्टिट्यूट’ नियमाचा शुक्रवारी भारताला पुरेपूर लाभ मिळाला. दुखापतग्रस्त होण्यापूर्वी जडेजाने फलंदाजीत ४३ धावांचे योगदान दिले. कन्कशन नियमानुसार ज्या शैलीचा खेळाडू जखमी होतो, त्याच खेळाडूला त्याचा कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात येता येते. मात्र, काल अष्टपैलू जडेजाच्या जागी फिरकीपटू युजवेंद्र चहलला संधी मिळाली आणि तो त्या संधीचे सोने करण्यात यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व न करणारा युवा खेळाडू आहे वॉर्नरचा फेव्हरेट
“झहीरने गांगुलीच्या नेतृत्वात जशी कामगिरी केली, तशीच टी नटराजन विराटच्या नेतृत्वात करू शकतो”
मोठी बातमी! कोरे अँडरसनची न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती; आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट
ट्रेंडिंग लेख-
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण
HBD गब्बर : चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी