शनिवार दि. 23 जूनला भारतीय क्रिकेट संघ तीन महिन्यांच्या प्रदिर्घ ब्रिटन दौऱ्यावर रवाना झाला आहे.
भारताचा ब्रिटन दौरा आयर्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेने सुरू होणार आहे.
त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारतीय संघाच्या या ब्रिटन दौऱ्यात सर्वांच्या नजरा इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेवर लागल्या आहेत.
या कसोटी मालिकेविषयी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकतीच पत्रकारांशी चर्चा केली. यामध्ये सचिनने प्रामुख्याने भुवनेश्वर कुमार आणि इंग्लंड दौऱ्यावर गेलेली भारतीय संघाच्या गोलंदाजी फळीवर भाष्य केले.
गेल्या कित्येक वर्षात भारताकडे आजच्या गोलंदाजांपेक्षा चांगली गोलंदाजांची फळी नव्हती असे तेंडुलकरने सांगितले.
सचिनच्या 24 वर्षाच्या कारकिर्दितही आज भारतीय संघाकडे आहेत तसे गोलंदाज नव्हते. असे सचिनने म्हणाला.
“भारतीय संघाकडे भुवनेश्वर सारखा स्विंग, उमेश यादव सारखा तेज आणि बुमराहच्या रूपाने हुशार गोलंदाजांची फळी आहे.” असे भारतासाठी 200 कसोटी सामने खेळणारा तेंडुलकर म्हणाला.
त्याचबरोबर सचिनने भुवनेश्वर कुमारचे खास कौतुक केले.
“भुवनेश्वर गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे. त्याने गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही जेव्हा भारतीय संघला गरज लागली आहे तेव्हा योगदान दिले आहे.” असे भुवनेश्वर विषयी बोलताना सचिन म्हणाला.
तसेच पत्रकारांच्या भारतीय संघाच्या गोलंदाजी कॉम्बिनेशन बद्धलच्या प्रश्नावर भाष्य करण्याचे सचिनने टाळले.
“अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कोणत्या गोलंदाजांना खेळवायचे हा निर्णय परिस्थिती पाहुन संघ व्यवस्थापन ठरवेल.” तेंडुलकरने गोलंदाजी कॉम्बिनेशन बाबत विचारल्यावर सांगितले.
भारतीय संघाच्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-Breaking- पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची निवृत्तीची घोषणा
-या खास कारणामुळे केदार जाधवने मानले पत्नीचे आभार