भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंड विरुद्ध भारत (England vs India) एकमात्र कसोटी सामना १ जुलैपासून खेळला जाणार आहे. हा सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे खेळला जाणार आहे. या कसोटीआधी संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा रॅपिड एँटीजेन टेस्टमध्ये कोरोना-१९ पॉजिटीव्ह आढळला आहे. त्याच्याजागी मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) याची संघात वर्णी लागली आहे.
मयांक सोमवारी इंंग्लंडला रवाना होणार आहे. तेथे पोहोचल्यावर तो ताबडतोब भारतीय संघाशी जोडला जाणार आहे. सरकारी नियमानुसार, त्याला क्वारंटाईनमध्ये राहण्याची आवश्यकता नाही. यामुळे संघाला गरज असल्यास तो खेळण्यास उपलब्ध राहणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ घोषित झाला तेव्हा त्याला संघात जागा मिळाली नव्हती.
केएल राहुल दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकला असल्याने मयांकच्या नावाची चर्चा होत होती. त्यातच रोहित या सामन्यात खेळणार का नाही हे यावर प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीत त्याच्यासाठी संघाचे दार उघडे झाले आहे.
मयांकची इंग्लंडमध्ये ही पहिलीच कसोटी असणार आहे. त्याला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने २०२२मध्ये फेब्रुवारी महिन्यात घरच्या मैदानावर शेवटची कसोटी मालिका खेळली होती. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेमध्ये त्याच्या पदरी निराशा आली होती. त्याने फक्त ५९ धावा केल्या होत्या.
मयांकने आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२च्या हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते. त्यावेळी त्याच्या बॅटमधून कमी धावा निघाल्या होत्या, संघही सहाव्या स्थानावर राहिला. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी त्याची कसोटी संघात निवड होणे अशक्य आहे. संघनिवड अधिकारी खेळाडूंची सध्याची कामगिरी पाहून त्याची संघात निवड करतात असे मत मांडले होते.
मयांकने २१ कसोटी सामने खेळताना ४१.३३च्या सरासरीने १४८८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने केलेल्या चार शतकांचा समावेश आहे. तो इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी सामन्यात खेळला तर त्याचा हा इंग्लंड विरुद्ध पहिलाच कसोटी सामना असणार आहे. त्याने भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. त्याने २०१८ आणि २०२१ दरम्यान आस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळताना २७३ धावा केल्या आहेत.
हा कसोटी सामना मागील वर्षाच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आहे. कोरोनामुळे तो रद्द करण्यात आल्याने भारतीय संघ मायदेशी परतला होता. या कसोटी मालिकेत भारत २-१ने पुढे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केविन-युवराजमधील भांडणानंतर इंग्लंडच्या दिग्गजाने मारला होता अल्टी-पल्टी शॉट, वाचा तो रोमांचक किस्सा
एकटा भिडला, अख्ख्या भारतीय संघाला नडला! आयर्लंडच्या हॅरीची फक्त कौतुक करावी अशी इनिंग
सूर्यकुमार पुनरागमनात सपशेल फेल, ‘गोल्डन डक’ नोंदवत रोहित-विराटच्या नकोशा यादीत सामील