विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे. भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यासाठी सराव सत्राला देखील सुरुवात केली आहे. पण अशात क्रिकेट दक्षिण अफ्रिकाने (CSA) एक मोठा निर्णय घेतला आहे. मागच्या काही दिवसांपासून दक्षिण अफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूने संक्रमित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर सीएसएने रविवारी देशांतर्गत क्रिकेटमधील सामन्यांना स्थगिती दिली आहे.
सीएसएने रविवारी (१९ डिसेंबर) माहिती दिली की, त्यांना कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशांदर्गत क्रिकेटमधील एहतियातन सीएसए ४ दिवसीय क्रिकेट मालिका स्थगित केली आहे. सीएसएने याबाबतीस सांगितले की, डिसेंबर १६-१९ (डिवीजन २) आणि डिसेंबर १९-२२ (डिवीजन १) यांच्यात होमारे पाचव्या सत्रातील सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हे सामने कोणत्याही बायो बबलशिवाय खेळले जात असल्यामुळे त्यांच्यावर ही स्थगिती लावण्यात आली आहे. आता हे सामने पुढच्या वर्षी खेळले जातील.
दरम्यान, भारत आणि दक्षिण अफ्रिका संघातील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंचुरियनमध्ये, दुसरा कसोटी सामना ३-७ जानेवारी दरम्यान जोहानिसबर्गमध्ये आणि तिसरा कसोटी सामना ११ ते १५ जानेवारीदरम्यान केपटाउनमध्ये आयोजित केला गेला आहे. सेंचुरियन आणि जोहानिसबर्गमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनचे रुग्ण मागच्या काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढत आहेत. अशात सीएसए या सामन्यांमध्ये कडक निर्बंद लावले आहेत. बोर्ड या मालिकेत कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू इच्छित नाही.
दक्षिण अफ्रिकेतील कोरोना प्रादुर्भाचा विचार केला, तर मागच्या महिन्याच्या सुरुवातीला रुग्णांची संघ २०० च्या आसपात होती. पण आता हीच संख्या दिवसाला कितीतरी हजारांवर पोहोचली आहे. १८-१९ डिसेंबरला दक्षिण अफ्रिकेत प्रत्येक दिवशी जवळपास २५ हजार रुग्ण सापडले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
वेगवान गोलंदाजीत हातखंडा असलेला इंग्लिश बॉलर अचानक करू लागला ऑफ स्पिन; पाहून आयसीसीही थक्क
‘या’ ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीची केली खूपच घाई, अजूनही करू शकले असते दमदार प्रदर्शन
बीसीसीआयपुढील अडचणीत वाढ? आयपीएलच्या मेगा लिलावास उशीर होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण