---Advertisement---

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक घोषित; आठपैकी दोन सामने होणार अमेरिकेत

On: गुरूवार, जून 2, 2022 12:06 PM
Team-India
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे पुढील काही महिन्यांतील वेळापत्रक खूप व्यस्त राहणार आहे. आता भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी२० मालिका खेळायची आहे. तसेच त्यानंतर युरोप दौऱ्यावरही जायचे आहे. यानंतरही भारतीय संघ व्यस्त राहणार असून यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक वेस्ट इंडिजने जाहीर केले आहे. 

भारताला (Team India) या दौऱ्यात ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळायचे आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी होणाऱ्या या मालिका महत्त्वाच्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध आधी वनडे मालिका (ODI Series) होणार आहे. त्यानंतर टी२० मालिका (T20I Series) खेळवली जाणार आहे. २२ जुलैपासून ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार असून या मालिकेतील तिन्ही सामने त्रिनीदादला होणार आहेत.

त्यानंतर २९ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादला होणार आहे. तर दुसरा आणि तिसरा सामना सेंट किट्सला होणार आहे. तर अखेरचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहेत. २०२४ साली होणाऱ्या टी२० विश्वचषकाचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका मिळून करणार आहेत. त्याच दृष्टीकोनातून अमेरिकेतही सामने खेळवले जात आहेत. यापूर्वीही फ्लोरिडामध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघात सामने झाले आहेत.

आत्तापर्यंत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील (West Indies vs India) आमने-सामने आकडेवारी पाहायची झाल्यास या दोन संघात १३६ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ६७ सामने भारताने जिंकलेत, तर ६३ सामने वेस्ट इंडिजने जिंकलेत. त्याचबरोबर २ सामने बरोबरीत सुटलेत आणि ४ सामन्यांचे निकाल लागलेले नाही.

त्याचबरोबर या दोन्ही संघात २० टी२० सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील १३ सामने भारताने जिंकले असून ६ सामने पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर १ सामन्याचा निकाल लागलेला नाही.

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक (India tour of West Indies)
वनडे मालिका
२२ जुलै – पहिला वनडे – क्विन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद; वेळ- संध्या. ७.०० वा.
२४ जुलै – दुसरा वनडे – क्विन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद; वेळ- संध्या. ७.०० वा.
२७ जुलै – तिसरा वनडे – क्विन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद; वेळ- संध्या. ७.०० वा.

टी२० मालिका 
२९ जुलै – पहिला टी२० – ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद; वेळ – रात्री. ८.०० वा.
१ ऑगस्ट – दुसरा टी२० – वॉर्नर पार्क, बॅसेटेरे, सेंट किट्स; वेळ – रात्री. ८.०० वा.
२ ऑगस्ट – तिसरा टी२० – वॉर्नर पार्क, बॅसेटेरे, सेंट किट्स; वेळ – रात्री. ८.०० वा.
६ ऑगस्ट – चौथा टी२० – सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा; रात्री. ८.०० वा.
७ ऑगस्ट – पाचवा टी२० – सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा; रात्री. ८.०० वा.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीला टीम इंडियात खेळण्याची संधी कशी मिळाली? स्वत: माहीनेच केलाय खुलासा

क्रिकेटविश्वातील ‘फिनीक्स’ आहे तो!

दीपक चाहर चढला बोहल्यावर, लाईव्ह सामन्यात मागणी घातलेल्या प्रेयसीबरोबर थाटला संसार, Photo व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---