भारतीय संघाचे पुढच्या काही महिन्यातील वेळापत्रक खूपच व्यस्त असणार आहे. पुढच्या महिन्यात संघाला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी जिम्बाब्वे दौरा करायचा आहे. मागच्या तब्बल सहा वर्षांमधला हा भारताचा पहिलाच जिम्बाब्वे दौरा असेल. केएल राहुल या दौऱ्यात संघात पुनरागमन करेल आणि कर्णधाराची भूमिका पार पाडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाला १८, २० आणि २२ ऑगस्ट रोजी हे सामने खेळायचे आहेत. सर्व सामने हरारेमध्ये खेळले जातील. उभय संघातील ही मालिका आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषकाच्या सुपर लीगचा भाग आहे. पुढच्या वर्षी खेळला जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताला भूषवायचे आहे.
एकदिवसीय विश्वचषकात सहभागी व्हायचे असेल, त्या सर्व संघांना सुपर लीगच्या पहिल्या १३ संघांमध्ये स्थान मिळवावे लागेल. जिम्बाब्वे संघ सद्या सुपर लीगमध्ये १३ व्या क्रमांकावर आला आहे. भारताने यापूर्वी २०१६ मध्ये शेवटचा जिम्बाब्वे दौरा केला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वातील संघाने त्यावेळी तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती.
माध्यमांतील वृत्तानुसार विराट कोहली (Virat Kohli) जिम्बाब्वेविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत खेळू शकतो. असे सांगितले जात आहे की, विराट लयीत येण्यासाठी निवडकर्त्ये त्याला या मालिकेत खेळवतील. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. विराट कोहली विश्रांतीवर असल्यामुळे तो या दौऱ्यात सहभागी नाहीये. अशात आशिया चषकापूर्वी फॉर्ममध्ये परतण्यासाठी तो जिम्बाब्वेविरुद्धच्या या मालिकेत खेळू शकतो.
भारतीय संघाला वेस्ट इंडीज दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. उभय संघातील एकदिवसीय मालिका २२ जुलै रोजी सुरू होईल, तर टी-२० मालिका २९ जुलैपासून खेळली जाईल. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन कर्णधाराची भूमिका पार पाडेल, तर टी-२० मालिकेत रोहित शर्मा संघात पुनरागमन करेल.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इशान किशनवर भडकला सूर्यकुमार यादव! पुढे जे झाले, ते पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
‘जलवा है हमारा!’ इंग्लंडविरुद्ध शतक झळकावणारा पंत आता ट्विटरवरही करतोय हवा
स्टोक्सने निवृत्ती तर घेतलीच, पण जाता जाता विराटबद्दल बोलून गेला असं काही, वाचाच