धरमशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने विजय मिळवला. पाहुण्या इंग्लंडचे प्रदर्शन इतके सुमार दर्जाचे होते की, भारताला दुसऱ्यांदा फलंदाजी देखील करावी लागली नाही. एक डाव 64 धावांनी यजमान भारतीय संघाने मालिकेतील हा पाचवा सामना नावावर केला. त्याचसोबत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 4-1 असा विजय मिळवला.
शनिवारी भारतीय संघाचा पहिला डाव 477 धावांवर गुंडाळला गेला. इंग्लंड संघ 259 धावांनी मागे होता. शनिवारी पहिल्याच सत्रात इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पण अवघ्या 195 धावा करून पाहुण्यांनी सर्व विकेट्स गमावल्या. परिणामी भारताने एक डाव शिल्लक ठेवून विजय मिळवला. तत्पूर्वी पहिल्या डावात इंग्लंड संघ 218 धावांवर गुंडाळला गेला होता. भारतीय संघासाठी रविचंद्रन अश्विन मॅच विनर ठरला. अश्विनने दुसऱ्या डावात 14 षटकात 77 धावा खर्च करून 5 विकेट्स नावावर केल्या. तर पहिल्या डावात त्यानेच 4 विकेट्स घेतल्या होत्या.
पहिल्या डावात भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा याने 103 आणि शुबमन गिल याने 110 धावांची खेळी केली होती. या दोघांच्या शतकामुळे भारताला मोठी धावसंख्या उभी करता आली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि देवदत्त पडिक्कल यांनीही अर्धशतकी खेळी पहिल्या डावात केली होती. या सर्वांच्या खेळीमुळे इंग्लंड संघावर दबाव तयार झाला. याच दबावाचा परिणाम म्हणून दुसऱ्या डावात देखील पाहुण्या संघाने झटपट विकेट्स गमावल्या.
धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
रणजी फायनलपूर्वी श्रेयस अय्यर ‘काली माँ’च्या चरणी नतमस्तक, पाहा व्हायरल फोटो
ऐतिहासिक! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ 147 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त