टी20 विश्वचषक 2024 च्या आवृत्तीत अनेक संघांनी चांगले प्रदर्शन केले आहे. या दरम्यान कमकुवत वाटत असणऱ्या संघानी यावेळी आपली ताकद दाखवली आहे. अमेरिका आणि अफगाणिस्ताच्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली. अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला होता. आता अमेरिका टी20 विश्वचषक 2026 च्या पात्र संघाच्या यादीत शामील झाली आहे. यामध्ये एकूण 12 संघ शामील झाले आहेत. याशिवाय आणखी 8 संघ क्वालिफायरद्वारे प्रवेश करतील.
टी20 विश्वचषक 2026 चे आयोजन भारत आणि श्रीलंका येथे होणार आहे. भारत आणि श्रीलंका सोबत पाकिस्तान आणि बांग्लादेश संघाने देखील यासाठी पात्र ठरला आहे. या यादीत वेस्ट इंडिज न्यूझीलंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाचे नाव देखील शामील आहे. अमेरिका पण विश्वचषक 2026 साठी भारतात येणार आहे. यूएसएने यंदाच्या विश्वचषकात चार साखळी सामने खेळले या दरम्यान दोन सामन्यात विजय, एका सामन्यात पराभव तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
टी20 विश्वचषक 2026 चे आयोजन भारत आणि श्रीलंका मध्ये होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात फेब्रुवारी मध्ये होऊ शकते. टी20 विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. तर आणखी 8 संघ क्वालिफायरद्वारे पात्र ठरतील. स्पर्धेत 20 संघात एकूण 55 सामने खेळले जातील. अद्याप वेळापत्रकाची घोषणा झाली नाही.
टी20 विश्वचषक 2026 साठी पात्र ठरलेले संघ – भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांग्लादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, यूएसए, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, आयर्लंड आणि पाकिस्तान.
यंदाच्या टी20 विश्वचषकत सुपर-8 साठी पात्र ठरलेले संघ 2026 च्या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत. ज्यामध्ये भारत, अफगाणिस्तान, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश आहे. तर श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड, आयर्लंड या चार संघांचा समावेश आयसीसीच्या टी20 मधील क्रमवारीद्वारे झाली आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यात सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू, टॉप-5 मध्ये एकही भारतीय नाही!
भारतीय वंशाच्या खेळाडूसमोर ख्रिस गेलही फेल! पठ्ठ्यानं अवघ्या 27 चेंडूत ठोकलं शतक
AIFF चा मोठा निर्णय, भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची हकालपट्टी; हे आहे कारण