काल (25 सप्टेंबर) एशिया कप स्पर्धेतील भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात रोमहर्षक सामना दुबईत झाला. अफगाणिस्तानच्या संघाने भारतीय संघाला बरोबरीत रोखण्यात यश मिळवले. अफगाणिस्तानविरूद्ध भारताने संघात तब्बल पाच बदल केले होते.
यात कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जयप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि यजुयेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या जागेवर केएल राहुल, खलील अहमद, दिपक चहर, मनिष पांडे आणि सिद्धार्थ कौल यांना संघात स्थान दिले.
भारताने जरी आपला दुय्यम संघ मैदानात उतरवला असला तरी अफगाणिस्ताने केलेल्या संघर्ष हा पाहण्यासारखा होता. भारतीय सलामीवीर लोकेश राहूल आणि अंबाती रायडू यांनी 110 धावांची दमदार सलामी दिली. त्यावेळी भारत सामना सहज जिंकेल असे वाटले होते. त्यानंतर अफगाणिस्तानने केलेला संघर्ष कायम स्मरणात राहिल.
शेवटच्या षटकात भारताचा रविंद्र जडेजा हा फलंदाजी करत होता. तर अफगाणिस्तानचा सर्वात यशस्वी खेळाडू राशिद खान गोलंदाजी करीत होता. शेवटच्या दोन चेंडूवर भारताला एका धाव हवी होती. जडेजा मिडविकेटला स्कुपशॉट मारला आणि झेलबाद झाला. सामना बरोबरी अवस्थेत संपला.
त्यावर माजी खेळाडूंनी टि्वटरवर अफगाणिस्तान संघाचे अभिनंदन करत प्रशंसा केली आहे. त्यात समालोचक हर्षा भोगले, संजय मांजरेकर, माजी कर्णधार वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
For all of Afghanistan's pluck, India must ask why a gettable total became so difficult to surpass. Even with the umpiring calls, should still have crossed the line.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) September 25, 2018
This must be a special day for @ACBofficials . Securing a tie against Team India is a monumental achievement and every Afghanistan player can be very proud of their grit and fight. There is something special in this Afghanistan team, have been most impressivein Asia Cup #INDvAFG
— VVS Laxman (@VVSLaxman281) September 25, 2018
Wow ! That was an unbelievable match. A tie to remember. Afghanistan have won more than hearts. A proud moment in their Cricketing history #AsiaCup2018
— Virender Sehwag (@virendersehwag) September 25, 2018
Afghanistan deserved this. A tie but in all fairness they have played unbelievably well and are a force to reckon with. Afghanistan must be very proud , they have some real winners #IndvAfg
— Mohammad Kaif (@MohammadKaif) September 25, 2018
What a disappointment that Afghanistan are not in the finals of this tournament. Fair to say the two best sides of this tournament competed hard and gave us all a nail bitting thriller. #INDvAFG
— Hemang Badani (@hemangkbadani) September 25, 2018
Afghanistan has a copyright on thrillers. And today we can actually say…Cricket is the real winner. Loved it. #tied #IndvAfg @StarSportsIndia
— Aakash Chopra (@cricketaakash) September 25, 2018