भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका शुक्रवारी (17 मार्च) सुरू झाली. उभय संघांतील कसोटी मालिका नुकतीच खेळली गेली असून भारताने यात विजय मिळवला. अशात वनडे मालिकेत विजयासाठी ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण प्रयत्न करेल. उभय संघांतील पहिला कसोटी सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील या पहिल्या सामन्यात नाणेफेक भारताने जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या पहिल्या वनेडसाठी उपलब्ध नाहीये. रोहितने पहिल्या वनडेतून वैयक्तिक कारणास्तव विश्रांती घेतली आहे. अशात कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पार पाडत आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) देखील वनडे मालिकेसाठी उपलब्ध नाहीये. कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव स्मिथ (Steve Smith) संघाचे नेतृत्व करत आहे.
दरम्यान, नुकत्याच कसोटी संघात खेळण्याची संधी न मिळालेला ईशान किशन या पहिल्या वनडेसाठी संघात घेतले गेले आहे. तसेच शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमधूनल वगळण्यात आलेला केएल राहुल (KL Rahul) देखील पुन्हा संघात जागा मिळवू शकला आहे. फिरकीपटू कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांना एकत्र खेळतानाही चाहते बऱ्याच दिवसांनी पाहतील.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – शुबमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, मिचले मार्श, स्टीव स्मिथ, मार्नल लाबुशेन, कॅमरून ग्रीन, जोस इंगलिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, शॉन एबॉट, मिचेल स्टार्क, एडम झंपा
(India vs Australia 1st ODI toss update)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! IND vs AUS वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच माजी कर्णधाराची अचानक निवृत्ती
स्टेडिअममध्ये पाय ठेवायला नव्हती जागा, कट्टर क्रिकेटप्रेमी चढले झाडावर, ‘या’ क्रिकेट सामन्याला तुफान गर्दी