सिडनी येथे झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 4 बाद 389 धावा केल्या होत्या. या धावांच्या बचावासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून उत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख खेळाडू स्टीव्ह स्मिथने हवेत मागे झेपावत भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरचा उत्कृष्ट झेल पकडला. हा झेल इतका जबरदस्त होता की, हा झेल पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
स्मिथने पकडलेल्या अप्रतिम झेलामुळे अय्यरला तंबूचा रस्ता पकडावा लागला. ही विकेट ऑस्ट्रेलिया संघासाठी खूप महत्त्वाची ठरली. कारण अय्यर विराट कोहलीसोबत मिळून एका भक्कम भागीदारीच्या दिशेने कूच करत होते.
स्मिथने हवेत मागच्या दिशेला झेपावत पकडला अप्रतिम झेल
श्रेयस अय्यरने 36 चेंडूत 38 धावांची खेळी साकारून तंबूत परतला. मोइसिस हेन्रीक्सच्या गोलंदाजीवर फटका खेळला होता. मात्र दुर्दैवाने मिड विकेटवर सर्कलच्या आतमध्ये हा झेल पकडला गेला. यासाठी स्मिथला आपल्या डाव्या बाजूला हवेत झेप घ्यावी लागली. हा झेल खूप अवघड होता, ज्याला पकडून स्मिथने आपल्या फिटनेसचा उत्तम नमुना सादर केला. अय्यर आणि कोहली यांच्यामध्ये 39 धावांची भागीदारी झाली होती. जेव्हा स्मिथने श्रेयसचा झेल पकडला. यापूर्वी शिखर धवन 30 धावा आणि मयंक अगरवाल 28 धावांची पारी खेळून माघारी तंबूत गेले होते.
https://twitter.com/_rchie0425/status/1332993600850948099
https://twitter.com/cricketcomau/status/1332985919989714945
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्टीव्ह स्मिथच्या
64 चेंडूत 108 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्ध दुसर्या वनडेत 4 गडी गमावून 389 धावांची विशाल धावसंख्या उभारली होती. भारताविरुद्ध स्टीव्ह स्मिथचे सलग तिसरे शतक होते. आणि या मालिकेतील हे दुसरे शतक होते.
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ
IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया
अय्यरच्या रॉकेट थ्रो पुढे धडाकेबाज वॉर्नर गारद; Video जोरदार व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला
वनडेत सर्वाधिक वेळा ३०० हून अधिक धावा करणारे संघ, भारताच्या नावे ‘हा’ विक्रम





