आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० क्रिकेटचं आगमन झाल्यापासून फलंदाजांच वर्चस्व वाढले आहे. वनडे क्रिकेटमध्येही ह्याचं प्रतिबिंब दिसून येतं. ५० षटकांमध्ये ३०० धावा काढणे, आता सहजसाध्य झाले आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वप्रथम इंग्लंडच्या संघाने १९७५ सालच्या विश्वचषकात भारतीय संघाविरुद्ध ३०० धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर आजपर्यंत अनेक संघांनी ३०० धावांची वेस ओलांडली आहे. या लेखात आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणत्या संघांनी सर्वाधिक वेळा ३०० हून अधिक धावा काढल्या आहेत, हे पाहणार आहोत.
वनडेत सर्वाधिकवेळा ३०० पेक्षा अधिक धावा करणारे संघ
१. भारत (११५)
सर्वाधिक वेळा ३०० हून अधिक धावसंख्या उभारणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने तब्बल ११५ वेळा ३०० किंवा त्याहून अधिक धावा काढल्या आहेत. ह्यातील ५ वेळा भारताने ४०० चा टप्पा ओलांडला आहे.
२. ऑस्ट्रेलिया (११०)
आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक वेळा ३०० हून अधिक धावा काढणाऱ्या संघांच्या यादीत ऑस्ट्रेलियन संघ दुसर्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाने ११० वेळा ही कामगिरी केली आहे.
३. दक्षिण आफ्रिका (८४)
दक्षिण आफ्रिकेने वनडे सामन्यांत ८४ वेळा ३०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ह्याशिवाय सर्वाधिक ६ वेळा ४०० हून अधिक धावसंख्या रचणारा दक्षिण आफ्रिका एकमेव संघ आहे.
४. पाकिस्तान (८१)
पाकिस्तानच्या संघाने आत्तापर्यंत ८१ वेळा ३०० धावांची वेस ओलांडली आहे. ३९९/१ ही त्यांची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या असून अजून एकदाही त्यांनी ४०० धावा केल्या नाही आहेत.
५, इंग्लंड (८०)
इंग्लंडने वनडे क्रिकेटमध्ये सर्वप्रथम ३०० धावांची वेस १९७५ सालच्या विश्वचषकात भारतीय संघाविरुद्ध ओलांडली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ८० वेळा त्यांनी हा कारनामा केला आहे.
६. श्रीलंका (७४)
श्रीलंकेने १९९२ साली झिम्बावेविरुद्ध सर्वप्रथम ३०० हून अधिक धावांचा पल्ला गाठला. एकूण ७४ वेळा ३०० हून अधिक धावा करतांना श्रीलंकन संघाने २ वेळा ४०० धावांचा टप्पा गाठला आहे.
७. न्यूझीलंड (६१)
या यादीत सातव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या ४०२/२ असून त्यांनी एकूण ६१ वेळा ३०० हून अधिक धावा काढल्या आहेत.
८. वेस्ट इंडिज (५०)
वेस्ट इंडिजच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० वेळा ३०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यापैकी ३१ सामन्यांमधे त्यांना विजय मिळाला आहे. मात्र अजून एकदाही त्यांनी ४०० धावांची वेस ओलांडली नाही आहे.
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरलेले ३ ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरुद्ध पहिल्या वनडेत चमकले
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला
भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला आरसीबीसाठी खेळायला मिळेल का?’, इंग्लंडच्या कर्णधाराच्या प्रश्नावर विराटने दिले ‘हे’ उत्तर
‘…आणि मला पुन्हा लय सापडली’, ऑस्ट्रेलियन शतकवीराची मोठी प्रतिक्रिया
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट