कोविड-१९ या जागतिक महामारीमुळे भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर परिणाम झाला आहे. ऑस्ट्रेलियातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा दौरा स्थगित केला आहे. गुरुवारी (३१ डिसेंबर) त्यांनी या गोष्टीची पुष्टी दिली आहे. नविन वर्षात हा दौरा खेळवला जाणार होता.
होणार होती तीन सामन्यांची वनडे मालिका
या दौऱ्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार होती. कॅनबेरा येथे २२ जानेवारी रोजी पहिला वनडे सामना होणार होता. त्यानंतर २५ जानेवारी रोजी मेलबर्न येथे तिसरा आणि २८ जानेवारी रोजी होबार्ट येथे तिसरा व शेवटचा वनडे सामना होणार होता. परंतु आता कोरोना महामारीमुळे हा दौरा पुढील हंगामापर्यंत स्थगित करण्यात आला आहे.
पुढील हंगामात होणार दौरा
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियाद्वारे याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, ‘भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात जानेवारी २०२१ मध्ये होणारी वनडे मालिका कोरोनामुळे स्थगित करण्यात आली आहे. मार्च-एप्रिल २०२२ मध्ये ही मालिका खेळवली जाईल. वनडे मालिकेसह या दौऱ्यावर तीन सामन्यांची टी२० मालिकाही होईल.”
The three-match Commonwealth Bank ODI series between the Australian and Indian women’s teams originally scheduled for January 2021 will be postponed until next season, with plans to expand the tour to include an additional three Twenty20 Internationals. https://t.co/tU2WiFVcAM
— Cricket Australia (@CricketAus) December 31, 2020
याविषयी बोलताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी सांगितले की, “आम्ही आशा करतो की, पुढील हंगामात भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये मोठी मालिका होईल. या मालिकेमुळे दोन्ही देशांतील क्रिकेट दर्शकांचे पूरेपुर मनोरंजन होईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
जागतिक कसोटी क्रमवारी: मेलबर्न कसोटीतील शतकाने रहाणेला फायदा, तर ‘हा’ खेळाडू पोहोचला अव्वलस्थानी
जागतिक कसोटी क्रमवारीत चमकले बुमराह-अश्विन, टॉप-१० मध्ये मिळवलं स्थान
सिडनीतील हवामान पाहून डेविड वॉर्नरला फुटला घाम; म्हणाला, “हा अंदाज चुकीचा असावा”






