IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2025 चा तिसरा सामना गाबा येथे खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे रद्द घोषीत करण्यात आला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ 13.2 षटकेच खेळता आली. ढगाळ वातावरण लक्षात घेता भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले. अश्विन आणि हर्षित राणाच्या जागी रवींद्र जडेजा आणि आकाशदीप आर संघात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने एका बदलासह मैदानात उतरला आहे. स्कॉट बोलँडच्या जागी जोश हेझलवूडने संघात प्रवेश केला आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पावसामुळे दोनदा खेळ थांबवण्यात आला. उपाहारापूर्वी पावसामुळे खेळ सुरू होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवसाचे हवामानही खराब असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान यजमान संघाकडून उस्मान ख्वाजा (19) आणि नॅथन मॅकस्विनी (4) क्रीजवर उपस्थित आहे.
India vs Australia 3rd Test Day 1 play has been called off due to rain..!!!!
– Australia 28/0 in 13.2 Overs. pic.twitter.com/RUPJ0hXqNA
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 14, 2024
या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने शानदार सुरुवात केली होती. मात्र यजमान ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना 10 विकेट्सने जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता अशा परिस्थितीत मालिकेतील हा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. कारण हा सामना जिंकणाऱ्या संघासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
हेही वाचा-
गाबा कसोटी: रोहित शर्माकडून चूक? टॉस हरल्यानंतरही पॅट कमिन्स या निर्णयामुळे आनंदी
24 तासांत आणखी एका पाकिस्तानी दिग्गजाची निवृत्ती, दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
2026 च्या टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघ भारतात येणार नाही, PCB ने अशी केली आपली मागणी पूर्ण