सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे . हा सामना गुरुवार पासून सिडनी क्रिकेट मैदानात सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करताना डेविड वॉर्नरच्या रूपाने पहिला बळी मिळवला. त्यानंतर रिषभ पंतने दोन झेल सोडले. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसर्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातील पहिले सत्र पावसामुळे बरेचसे वाया गेले. त्यामुळे दुसर्या सत्राची सुरुवात सुद्धा उशिरा झाली. या सत्रात रिषभ पंतने ऑस्ट्रेलिया संघाकडून कसोटीत पदार्पण करत असलेल्या विल पुकोवस्कीचे 10 मिनिटांच्या दरम्यान दोन झेल सोडले. त्यामुळे सोशल मीडियावर झेल सोडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्याला ट्रोल केले जात आहे. पहिला झेल त्याने आर अश्विनच्या गोलंदाजीवर आणि दुसरा मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर सोडला.
रिषभ पंतने पहिला झेल 21.6 षटकात आश्विनच्या गोलंदाजीवर सोडला. तेव्हा विल पुकोवस्की 69 चेंडूचा सामना करताना 26 धावांवर खेळत होता. अश्विनचा हा चेंडू विल पुकोवस्कीच्या बॅटची कडा घेवून मागे गेला होता. रिषभ पंतच्या ग्लोव्सला लागल्यानंतर हा झेल सुटला. त्यानंतर अश्विन नाराज दिसून आला.
Pant gives Puc a life! #AUSvIND pic.twitter.com/PwhpHuJI4D
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021
त्यानंतर 24.6 षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर रिषभ पंतने पुन्हा एकदा झेल सोडला. यावेळी वाटले त्यांनी झेल घेतला आहे. परंतु टीव्ही पंचाने रिप्ले मध्ये पाहिले. तेव्हा दिसून आले की रिषभ पंतने चेंडू जमिनीवरून उचला आहे. यावेळी विल पुकोवस्की 80 चेंडूचा सामना करून 32 धावांवर खेळत होता.
त्याचबरोबर आता हे दोन झेल सोडणे भारतावर भारी पडताना दिसले. पुकोवस्कीने या जीवदानाचा फायदा घेत कारकिर्दीतील पहिले कसोटी अर्धशतक केले. त्याने 110 चेंडूत 62 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मार्नस लॅब्यूशानेबरोबर 100 धावांची भागीदारी केली.
A rollercoaster of emotions for Will Pucovski! Initially given out, but on closer inspection he's recalled to the crease! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/WgT5lCRjAE
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021
पंतने पुकोवस्कीचे दोन झेल सोडल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल झाला.
"The third umpire is looking for conclusive evidence to say the ball has bounced … and in this particular case the fingers weren't underneath the ball from the keeper." – Simon Taufel #AUSvIND pic.twitter.com/zhroJTRu53
— 7Cricket (@7Cricket) January 7, 2021
https://twitter.com/FarziCricketer/status/1347049337587519488?s=19
#RishabhPant should focus on his wicket keeping.
He doesn't take as many catches as he dropped.#INDvsAUSTest
— Devendra Ram Jatav (@DevendraJatavDJ) January 7, 2021
https://twitter.com/cricketwallah/status/1347050795787710465
https://twitter.com/s_badrinath/status/1347053667086598146
#RishabhPant is Kamran Akmal of India. #INDvAUS
— King in the North ???? (@skywalker8901) January 7, 2021
https://twitter.com/KnowHumour/status/1347062416803209216
#AUSvINDtest
*Rishabh Pant already dropped two catches today**Meanwhile Wriddhiman Saha-: pic.twitter.com/oGkDW1u9C4
— Pulkit???????? (@pulkit5Dx) January 7, 2021
https://twitter.com/Syedsai87471200/status/1347086320825352192
या सामन्यात पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 55 षटकात 2 बाद 166 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशाने आणि विल पुकोवस्की यांनी अर्धशतके झळकावली आहेत. लॅब्यूशाने 67 धावांवर नाबाद आहे. तर स्टीव्ह स्मिथ 31 धावांवर नाबाद खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“स्टीव्ह स्मिथ पिंजर्यातील वाघ आहे, तो केव्हा ही हल्ला करू शकतो”
स्मिथची तयारी जोरात! हॉटेलरुममध्ये चक्क जर्सी घालून करतोय फलंदाजीचा सराव
आनंदाची बातमी! सौरव गांगुलीला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; घरी परतताना दिली ‘ही’ प्रतिक्रिया





