भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी पाचव्या दिवशी विजयासाठी 309 धावांची आवश्यकता आहे. मात्र भारतीय संघाला हे आव्हान पेलणे अवघड जाणार आहे. कारण भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुसर्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरणार नाही. त्याचबरोबर रिषभ पंत याला सुद्धा दुखापत झाली आहे. त्याची दुखापत गंभीर नाही, मात्र अजून ही त्याला वेदना होत आहेत. त्याच्यावर उपचार केले जात आहेत. त्यामुळे दुसऱ्या डावात तो वेदनाशामक इंजेक्शन घेऊन फलंदाजीसाठी उतरू शकतो.
भारतीय संघाच्या पहिल्या डावात तिसर्या दिवशी फलंदाजी करताना रिषभ पंतच्या डाव्या कोपराला दुखापत झाली होती. पहिल्या डावात 67 चेंडूत 36 धावा करणार्या रिषभ पंतला पॅट कमिन्सच्या शॉर्ट चेंडूवर पूल शॉट खेळताना दुखापत झाली होती. तो पट्टी बांधून पुन्हा मैदानावर आला होता. मात्र त्या वेगाने धावा काढू शकला नाही. तो जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर यष्टीच्या मागे झेल देवून बाद झाला. आयसीसीच्या नवीन नियमानुसार रिषभ पंतची जागा रिद्धीमान साहाने घेतली. त्याच्या जागी यष्टिरक्षण केले.
बॉर्डर-गावसकर मालिकेतून जडेजा बाहेर
अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या डाव्या अंगठ्याला मिशेल स्टार्कचा चेंडू लागला होता. जडेजाने दुसर्या डावात गोलंदाजी सुद्धा केली नाही. जडेजाचा अंगठा स्कॅन केला आहे. तो ज्या हाताने गोलंदाजी करतो, त्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या अंगठ्याला डिस्लोकेशन आणि फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्यासाठी फलंदाजी करणे अवघड आहे.
त्यामुळे 15 जानेवारी पासून ब्रिस्बेन येथे खेळल्या जाणार्या चौथ्या कसोटीसाठी तो भारतीय संघाचा भाग नसणार आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रांच्या माहितीनुसार जडेजा दोन ते तीन आठवडे क्रिकेट पासून दूर राहू शकतो. जडेजा मालिकेतून बाहेर पडल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्याने पहिल्या डावात 62 धावा देवून 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथला डायरेक्ट थ्रोवर धावबाद केले होते. तसेच पहिल्या डावात 28 धावा सुद्धा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या:
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: कृणाल पंड्याच्या दमदार खेळीच्या जोरावर बडोद्याची विजयी सुरुवात
सिडनीच्या मैदानावर शेरेबाजीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत
टी-१० फॉरमॅटमुळे क्रिकेटपटूंची कारकीर्द वाढू शकेल, ड्वेन ब्राव्होने मांडले मत