भारत आणि ऑस्ट्रेलियातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना दिवस- रात्र कसोटी सामना असणार आहे. यापूर्वी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात दुसरा सराव सामना ११ डिसेंबरपासून खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने भाग घेतला नाही. अशामध्ये पुन्हा एकदा कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. त्याने नाणेफेक जिंकून फलंदाज करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाच्या नजरा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिवस- रात्र कसोटी सामन्यापूर्वी सलामी जोडी निवडण्यावर असेल. याव्यतिरिक्त हनुमा विहारीला स्पेशल फलंदाज म्हणून खेळवले जाऊ शकते का, यावरही संघ व्यवस्थापनाच्या नजरा असतील. चेतेश्वर पुजारा सध्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नाही. अशामध्ये मयंक अगरवाल आणि पृथ्वी शॉकडे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. परंतु त्यांनाही या सराव सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. शॉ आणि मयंक यांनी अनुक्रमे ४० आणि २ धावा करत बाद झाले. त्यासोबतच शुबमन गिललाही खास काही करता आले नाही आणि तोही ४३ धावा करून बाद झाला.
यानंतर चौथ्या क्रमांकावर रहाणेने स्वत:च्या जागी हनुमा विहारीला चौथ्या क्रमांकावर पाठवले. दुसरीकडे यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि रिषभ पंतकडे संधी आहे. साहाने मागील सराव सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पंतकडेही या सामन्यात चमकदार कामगिरी करण्याची संधी होती. परंतु त्यालाही काही खास करता आले नाही. तो केवळ ५ धावा करून बाद झाला. आता साहा कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.
अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारत अ
पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया अ
जो बर्न्स, मार्कस हॅरिस, निक मॅडिन्सन, बेन मॅकडर्मोट, कॅमरॉन ग्रीन, जॅक विल्डरमथ, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक/ कर्णधार), सीन ऍबॉट, विल सदरलँड, मिचेल स्वेप्सन आणि हॅरी कॉनवे
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
ट्रेंडिंग लेख-
शंभर शतके ठोकणाऱ्या सचिनला आवडतात स्वतःच्या ‘या’ तीन खेळ्या; दुसरी आहे खूपच खास
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’






