भारत आणि ऑस्ट्रोलीया यांच्यात सुरू असलेल्या टी२० मालिकेत कोरोना काळात पहिल्यांदाच मैदानाच्या एकूण क्षमतेपैकी ५० टक्के प्रेक्षकांना सामन्याला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या संधीचा फायदा घेत प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. याच मालिकेतील सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे, ज्यात आपल्या रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी वडील त्याला क्रिकेट सामना दाखवत होते.
दुसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करत होता. १५ व्या षटकाच्या समाप्तीनंतर कॅमेऱ्याचे लक्ष रडणाऱ्या मुलाकडे गेले. मुलाला शांत करण्यासाठी वडिलांनी कॅमेऱ्याकडे त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते यशस्वी झाले नाही.
मुलाने कॅमेऱ्याकडे लक्ष न देता आपले रडणे सुरूच ठेवले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘क्रिकेट सर्वांनाच आवडत नाही’, असे मजेशीर कॅप्शन लिहीत या प्रसंगाचा जिफ व्हिडिओ पोस्ट केला.
https://twitter.com/cricketcomau/status/1335515263328874498?s=20
या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. मालिकेतील तिसरा सामना ८ जानेवारीला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हे नाही पाहिलं तर काय पाहिलं! भक्कम बचाव असलेला पुजारा अफलातून चेंडूवर त्रिफळाचीत
धोनीच्या पत्नीने अस्वलाला चारले अन्न, तर सिंहाच्या छाव्याला पाजले दूध; Video तुफान व्हायरल