---Advertisement---

प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळणे सोपे नाही, ऑस्ट्रेलियन कर्णधाराची प्रतिक्रिया

On: शुक्रवार, डिसेंबर 18, 2020 11:19 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघाचा कसोटी कर्णधार टीम पेनने भारता विरुद्ध एॅडलेड येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 73 धावांची नाबाद खेळी केली. पेनने मान्य केले की फ्लड लाइट्स मध्ये गुलाबी चेंडूला बघणे अवघड होते. पेनने ऑस्ट्रेलिया कडून सर्वाधिक 73 धावा केल्या मात्र त्यानंतर ही ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव 191 धावसंख्येवर गुंडाळला.

टीम पेन पत्रकार परिषदेत म्हणाला, “निश्चितपणे वेगवान गोलंदाजांची पातळी उत्कृष्ट राहिली. गुलाबी चेंडू कदाचित याचे एक कारण असेल. हे समजून घेणे आणि याला खेळणे सोपे नाही आणि मी तुम्हाला सांगू शकतो की हे खेळाडूंंसाठी अवघड होते.”

फलंदाजी करणे सोपे नव्हते, तरीही काही फलंदाजांनी अति दक्षता घेतली. पहिल्या डावात 244 धावावर गुंडाळल्यानंतर ही दुसरा दिवस संपेपर्यंत भारतीय संघाने 62 धावांची आघाडी घेतली.

पेनने मान्य केले की त्यांच्या संघाचे हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन नव्हते. तो म्हणाला, “हो, निश्चितपणे हे आमचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन नव्हते. परंतू याचे श्रेय त्यांना (भारतीय संघाला ) जाते. त्यांनी खरोखरच उत्तम गोलंदाजी केली, आमच्यावर दबाव आणला, आम्हाला सूर गवसला नाही, किंवा भागीदारी करू शकलो नाही. आम्ही आहे असे करू शकलो नाही. परंतु आमच्या सलामी फलंदाजानी चांगले काम केले.”

अनुभवी गोलंदाज अश्विनने आपल्या फिरकीचे जाळे विस्तारात 4 गडी जाळ्यात अडकवले. त्याबरोबर उमेश यादवने 3 गडी बाद केले तर बुमराहने 2 गडी बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 191 धावसंख्येवर गडगडला.

पेन म्हणाला, “आमचे गोलंदाज दमदार आहेत त्यामुळे उद्या काहीही होवू शकते. शेवटी आम्हाला लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. आम्हाला माहित आहे, हे आव्हानात्मक असेल. आम्हाला आमचे वेगवान गोलंदाजीचे आक्रमण माहित आहे आणि काल नॅथन लियॉनच्या 10 षटकात खुप संधी मिळाल्या होत्या. आम्ही वेगाने विकेट घेवू शकतो आणि आम्ही उद्या नक्कीच हे प्रयत्न करू,धावफलक नियंत्रणात ठेवू. अपेक्षा आहे कमीत कमी धावसंख्येवर थांबवू.”

संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावावर; दिवसाखेर भारताला ६२ धावांची आघाडी
– अश्विनला गृहीत धरणे महागात पडले, माजी कर्णधाराचा ऑस्ट्रेलियाला घरचा आहेर
बूम बूम बुमराहच्या गोलंदाजीपुढे थंडावले ऑस्ट्रेलियन फलंदाज, अवघ्या ३५ धावांवर गमावल्या २ विकेट्स

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---