यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या वनडेत आणि पहिल्या टी-20 सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या बॅटने मैदानावर धुमाकूळ घातला आहे. शेवटच्या वनडे सामन्यात नाबाद 66 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता. त्याच खेळीची पुनरावृत्ती करताना रवींद्र जडेजाने टी-20 मालिकेतील पहिल्याच टी-20 सामन्यात नाबाद 44 धावांची झुंजार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला आणि पुन्हा एकदा विजयाचा नायक ठरला. त्याचबरोबर सध्या त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
तिसऱ्या वनडेत भारतीय संघाच्या विजयानंतर जडेजाच्या खांद्यावर बर्फ लावला होता. यादरम्यान चर्चा करताना माजी भारतीय खेळाडू अजय जडेजा हे रवींद्र जडेजाला म्हणतात की, “खांद्याला हे काय केलंस. चिंता याची होत आहे की हा काय बर्फ लावलाय. तो तर ग्लासमध्ये असायला पाहिजे.”
Men will be men..Hilarious conversation between Ravindra Jadeja and Ajay Jadeja😂🤣 pic.twitter.com/dO6O7QuEEG
— DS🇮🇳 (मोदी का परिवार) (@theace_7) December 3, 2020
जडेजाचे हे वाक्य ऐकून रवींद्र जडेजाने सुद्धा त्यावर मजेदार उत्तर दिले. त्याचे हे उत्तर ऐकून स्टुडिओत हजर असणारे प्रत्येकजण हसू लागले. रवींद्र जडेजा म्हणाला की, “हो इकडे रात्र आहे, असायला तर पाहिजे.”
भारतीय संघाला हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या दमदार भागीदारीमुळे तिसर्या वनडेत विजय मिळवता आला आणि व्हाईटवॉश होण्यापासून संघाला वाचवले. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया संघाने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली.
रवींद्र जडेजाने साकारली नाबाद 44 धावांची झुंजार खेळी
त्याचबरोबर टी-20 मालिकेतील पहिल्याच टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध लगातार विकेट्स गेल्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला होता. भारताने 92 धावेवर केएल राहुलच्या रूपाने पाचवा गडी गमावला होता. त्यानंतर हार्दिक सुद्धा तंबूत लगेच परतला. अशा स्थितीत जडेजाने 23 चेंडूत नाबाद 44 धावांची झुंजार खेळी केली आणि भारतीय संघाला तारले आणि यजमान ऑस्ट्रेलियाला 162 धावांचे लक्ष्य दिले होते. जे पूर्ण करण्यात यजमान अपयशी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: चेंडू लागला जडेजाच्या हेल्मेटला अन् त्रास झाला ऑस्ट्रेलियाला
भारताच्या आव्हानाचा दिशेने कूच करणाऱ्या स्मिथचा सॅमसनने घेतला कठीण झेल, Video जोरदार व्हायरल
भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नटराजनचा भावूक संदेश, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर