---Advertisement---

‘गब्बर’ धवनची जुनी कमजोरी आली समोर; पाहा Video

On: शुक्रवार, डिसेंबर 4, 2020 9:59 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला आज कॅनबेरा येथे सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत केले. वनडे मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाने टी२० मालिकेला विजयी आरंभ केला आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवला असला, तरी भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा या सामन्यात अपयशी ठरला. शिखरची वेगवान गोलंदाजांविरूद्ध चाचपडण्याची कमजोरी पुन्हा समोर आली.

स्टार्कचा ठरला शिकार

ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताकडून शिखर धवन व उपकर्णधार केएल राहुल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. मिचेल स्टार्क व जॉश हेजलवूड या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पहिल्या तीन षटकांत भारताच्या सलामीवीरांना चांगले जखडून ठेवले.

मिचेल स्टार्कने टाकलेल्या तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर धवन चकला. जवळपास १४४ किमी/प्रतितास इतक्या वेगाने टाकला गेलेला हा वेगवान यॉर्कर चेंडू काहीसा स्विंग झाला आणि धवनचा उजवा स्टंप उखडला गेला. धवन ६ चेंडूत १ धाव काढण्यात यशस्वी ठरला.

वेगवान गोलंदाजांविरुद्ध ठरतो अपयशी

धवन डावाच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांविरुद्ध नेहमी अडखळताना दिसतो. धवनला आंतरराष्ट्रीय सामन्यात मिचेल स्टार्क, मोहम्मद आमिर, ट्रेंट बोल्ट, जेम्स एँडरसन, कागिसो रबाडा यांसारख्या गोलंदाजांनी कायम त्रस्त केले आहे. हलक्या स्विंग होणाऱ्या चेंडूंवर तो नेहमी फसतो. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही, डावाच्या सुरुवातीला तो झुंजत असलेला दिसत होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘गब्बर’ धवनची जुनी कमजोरी आली समोर; पाहा Video

‘बर्फ खांद्यावर काय करतोय, तो तर ग्लासमध्ये पाहिजे’, दोन जडेजांमधील चर्चेचा Video भन्नाट व्हायरल

भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नटराजनचा भावूक संदेश, म्हणाला…

ट्रेंडिंग लेख-

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी

…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली

गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---