भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. त्याचबरोबर तिसरा कसोटी सामना सिडनीत 7 जानेवारी पासून खेळला जाणार आहे. त्यापूर्वी क्वारंटाइनच्या नियमामुळे निर्माण झालेल्या वादावर भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रतिक्रिया दिली आहे.
रहाणे म्हणाला आहे की भारतीय संघातील खेळाडू जैव सुरक्षिततेच्या नियमामुळे नाराज नाहीत. रहाणेने हे ही मान्य केले की, जेव्हा फाईव्ह स्टार हॉटेल बाहेर जीवन सामान्य दिसत आहे. तेव्हा रूममध्ये राहणे म्हणजे आव्हान आहे. मागील काही दिवसापूर्वी बातमी आली होती की, भारतीय खेळाडू सिडनीतील क्वारंटाइन नियमामुळे नाराज आहेत. खेळाडूंना हॉटेलमध्येच राहावे लागत आहे. तसेच त्यांना चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला गेल्यावर क्वारंटाईन व्हायचे नाही.
यावर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तो म्हणाला, “आम्ही यापासून नाराज नाही. परंतु इथे काही आव्हाने आहेत. कारण सिडनीत जीवन सामान्य दिसून येते. आम्ही नाराज झालेलो नाही. कारण आम्हाला माहित आहे, या ठिकाणी आमची प्राथमिकता काय आहे.”
दरम्यान असेही वृत्त आले होते की भारतीय संघ ब्रिस्बेनला चौथा कसोटी सामना खेळू इच्छित नाही. त्यामुळे दौऱ्यातून माघार घेण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना अजिंक्य रहाणे म्हणाला, “भारतीय संघाचे लक्ष सिडनीत होणार्या तिसर्या कसोटी सामन्यावर आहे. आम्ही सर्व तयार आहोत आणि चांगले खेळण्याचा प्रयत्न करू. आम्हाला माहित आहे की सिडनीत जीवन सामान्य आहे. मात्र खेळाडू रूम पर्यंत मर्यादित आहेत, ते ठीक आहे. आम्हाला माहित याचा सामना कसा करायचा आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत. ”
असे असले तरी सिडनी सामन्यानंतर परत जाण्याच्या संबधित विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर देणे मात्र रहाणेने टाळले.
व्यवस्थापक घेतील निर्णय
अजिंक्य रहाणे म्हणाला, आम्ही खेळाडू फक्त या सामन्यावर लक्ष देत आहोत. त्यामुळे बाकी सर्व निर्णय व्यवस्थापक घेतील. ज्या ठिकाणी आमची बाब आहे. त्या ठिकाणी मैदानावर आम्ही आमचे सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. तिसरा कसोटी सामना उद्यापासून(7 जानेवारी) खेळला जाणार आहे. त्यामुळे आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करून सामना जिंकण्याचा प्रयत्न करू.
महत्त्वाच्या बातम्या –
तिसर्या कसोटी सामन्यात ‘हा’ २२ वर्षीय खेळाडू डेविड वॉर्नरबरोबर करु शकतो सलामीला फलंदाजी
अजिंक्य रहाणेच्या कोचची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कोटिंग स्टाफमध्ये एन्ट्री
आयपीएल प्रेमींसाठी खूशखबर! ‘या’ दिवशी होऊ शकतो आयपीएल २०२१ साठी लिलाव