---Advertisement---

ब्रिस्बेन कसोटी खेळण्यासाठी भारतीय संघ तयार, पण असेल ‘ही’ अट

On: रविवार, जानेवारी 10, 2021 1:22 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे. याच्यानंतर दोन्ही संघात चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. काही दिवसापूर्वी बातमी आली होती की, ब्रिस्बेन येते क्वारंटाइनचे नियम खूप कडक आहेत आणि त्यामुळे भारतीय संघाने चौथा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता.

त्यामुळे या मुद्द्यावर खूप चर्चा झाली होती. मात्र आता भारतीय संघ ब्रिस्बेन येथे चौथा कसोटी सामना खेळण्यास तयार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी मालिकेतील चौथा सामना 15 जानेवारी पासून ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. मात्र चौथा कसोटी सामना संपल्यानंतर तत्काळ भारतीय संघाची रवानगी करण्याची व्यवस्था करावी, असे बीसीसीआयने सांगितले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार बीसीसीआयचा एक वरीष्ठ अधिकारी म्हणाला आहे की, “भारताने ब्रिस्बेन येथे खेळण्यास कधी ही नकार दिला नव्हता. त्याचबरोबर आरोग्य संबधित नियमाचे पालन करण्यास सुद्धा नकार दिला नव्हता. बीसीसीआयने खेळाडूंना हॉटेलमध्ये फिरण्याचे स्वातंत्र्य द्यावे आणि सामना संपल्यानंतर तातडीने त्यांची रवानगी करण्याची मागणी केली आहे.”

बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितले आहे की, चौथा सामना संपल्यानंतर भारतीय संघाला मायदेशी परतण्याची व्यवस्था अशा प्रकारे केली जावी की, त्यांना अनावश्यक तिथे रहावे लागू नये आणि भारतीय संघाला तातडीने रवाना केले जावे. त्यांच्यासाठी पहिल्या विमानाची सोय करावी.

आतापर्यंत ऑस्ट्रेलियातून दिल्लीत येण्यासाठी अशा प्रकारचे कोणतेही प्रतिबंध नाहीत. मात्र बीसीसीआयला शंका आहे की, या महामारीची स्थिती बघता काही बदल होण्याची शक्यता आहे.

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत 

सध्या सुरु असलेल्या सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाने आपला दुसरा डाव 87 षटकांत 6 बाद 312 धावसंख्येवर घोषित केला आहे. तसेच पहिल्या डावातील 94 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने भारताला 407 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 2 बाद 98 धावा केल्या आहेत. अजूनही भारताला 309 धावांची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

वर्णद्वेषी टीका! ‘अशा मूर्खपणाची ही पहिलीच वेळ नाही, मलाही असंच..’, हरभजनकडून ‘त्या’ कटू आठवणींचा पुनरूच्चार

कृणाल पंड्याने शिवीगाळ करत दिली करियर संपवण्याची धमकी, दीपक हुड्डाचा गंभीर आरोप

Video: आता सुट्टी नाय! चौथ्या दिवशीही तोच प्रकार, सिराजवर वर्णद्वेषी टीका; भारतीय संघाने थेट सामना थांबवला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---