भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात शुक्रवारपासून(15 जानेवारी) चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. हा सामना ब्रिस्बेन येथील गाबा या क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. मात्र या मालिकेतील शेवटच्या सामन्यातसुद्धा फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्यात आली नाही. यावर आता माजी गोलंदाज अजित आगरकर याने प्रतिक्रिया दिली आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला खेळण्याची संधी दिली जाईल, असे अनेकांना वाटत होते. पण त्याला संधी दिली गेली नाही. त्यामुळे भारतीय संघाचे माजी गोलंदाज अजित आगरकर आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचबरोबर आगरकर म्हणाले, यामुळे कुलदीप यादवचा आत्मविश्वास कमी होईल.
पाच गोलंदाजांमध्ये एक अनुभवी गोलंदाज हवा होता
एका कार्यक्रमात बोलताना आगरकर म्हणाला, “2018-19 साली ऑस्ट्रेलिया दौर्यावर कुलदीप यादवने उत्तम कामगिरी केली होती. चौथ्या कसोटी सामन्यात समावेश न केल्याने तो नक्कीच नाराज असेल. त्याला मालिकेत एक ही सामना खेळायला मिळाला नाही. जेव्हा तुम्ही 5 गोलंदाजांसोबत खेळत आहात, तेव्हा एका अनुभवी गोलंदाजाला खेळण्याची संधी द्यायला हवी होती.”
कुलदीप यादवच्या अनुभवाने संघाला मिळाली असती मदत
आगरकर म्हणाला, “वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीप यादवला संधी द्यायला हवी होती. यामुळे गोलंदाजीमध्ये संतुलन निर्माण झाले असते. भारतीय संघाकडे मिशेल स्टार्कसारखा गोलंदाज नाही. सर्व वेगवान गोलंदाज नवीन आहेत. अशात एक अनुभवी फिरकीपटू कामी आला असता. कुलदीप यादवच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. याची भारतीय संघाला मदत मिळू शकली असती. त्याने अगोदरही ऑस्ट्रेलियात गोलंदाजी केली आहे. ”
कुलदीप यादवने मागील दौर्यात मालिकेच्या शेवटच्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या.
भारतीय संघाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 2018-19 मध्ये कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात 2-1 अशा फरकाने पराभूत केले होते. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीत खेळला गेलेला शेवटचा कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. शेवटच्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने 5 विकेट्सने घेतल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी कुलदीप यादवचे कौतुक केले होते. त्यांनंतर कुलदीप यादवला एक ही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कुलदीप यादवने आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 24.12 च्या सरासरीने 24 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
लॅब्यूशेनने शतकी खेळीने करत केवळ स्मिथलाच नाही तर ‘या’ दिग्गजांनाही टाकले मागे
पुन्हा येरे माझ्या मागल्या! सिडनी पाठोपाठ ब्रिस्बेनमध्येही सिराजबद्दल प्रक्षेकांमधून ऐकू आले अपशब्द
डेव्हिड वॉर्नरचा रोहित शर्माने घेतला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ