---Advertisement---

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वॉर्नरसोबत ‘हा’ फलंदाज उतरणार सलामीला, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे संकेत

On: शुक्रवार, नोव्हेंबर 13, 2020 3:44 PM
---Advertisement---

मेलबर्न। भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यादरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोवस्कीने दमदार कामगिरी केली. परंतु असे असले तरीही भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात डेविड वॉर्नरसोबत जो बर्न्स सलामीला फलंदाजी करणार असल्याचे संकेत, ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी दिले आहेत.

वॉर्नर आणि बर्न्समध्ये चांगला ताळमेळ- लँगर
लँगर म्हणाले, “विल पुकोवस्की ते सर्वकाही करत आहे, ज्याने त्याचे पहिल्या कसोटीत खेळणे शक्य आहे. परंतु याबाबतीत आम्हाला विचार करावा लागेल. मागच्या वेळी जेव्हा आम्ही कसोटी क्रिकेट खेळले होते, तेव्हा आम्ही जो बर्न्स आणि डेविड वॉर्नरच्या जोडीला पसंती दिली होती. खरं तर त्यांच्यात खूप चांगला ताळमेळ आहे. त्यामुळे मी म्हणेल की, ही जोडी कायम ठेवली पाहिजे.”

‘महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या खेळाडूंना करायचे नाही दुर्लक्षित’
“आज आम्ही ज्या स्थितीत आहोत, तिथे पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या खेळाडूंना आम्हाला दुर्लक्षित करायचे नाही. खूप काळापासून ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या यशाचे हे महत्त्वाचे कारण राहिले आहे,” असेही लँगर पुढे बोलताना म्हणाले.

बर्न्स याने मागील उन्हाळ्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून ३२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. सोबतच त्याने शेफील्ड शील्ड हंगामाच्या सुरुवातीला काही खास कामगिरी केली नाही. त्यात त्याने ११.४० च्या सरासरीने ५७ धावा केल्या आहेत. दुसरीकडे २२ वर्षीय पुकोवस्कीने सलग २ द्विशतके ठोकली आहेत. त्याने पश्चिम ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२ धावा आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५५ धावांची अफलातून खेळी केली आहे.

बर्न्स आणि वॉर्नरच्या सलामी जोडीने ५०.५६ च्या सरासरीने १३६५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला आयसीसी कसोटी रँकिंग्मध्ये अव्वल स्थानी पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“विराट कसोटी मालिकेत नसणे हे निराशाजनक, परंतु तरीही भारताकडे सुपरस्टार्स आहेत”

-“…त्यामुळे भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिका सहज जिंकेल”, माजी कर्णधाराची भविष्यवाणी

-…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---