सिडनी। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 6 डिसेंबर पासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेआधी भारतीय संघाने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आॅस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळला आहे. हा सामना अनिर्णित राहिला.
या सराव सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली गोलंदाजी करतानाही दिसला होता. तसेच त्याने 7 षटके गोलंदाजी करताना त्याला एक विकेटही घेण्यात यश आले. पण त्याला गोलंदाजी करणार असल्याचे पाहून यष्टीरक्षक रिषभ पंत मात्र गोंधळला होता.
त्याने विराटने गोलंदाजी करण्याआधी यष्टीमागून विचारले की नक्की विराट वेगवान की फिरकी गोलंदाजी करणार आहे? पंतच्या या प्रश्नावर विराटनेही हातवारे करत मध्यमगती गोलंदाजी करणार असल्याचे सांगितले.
Well look who had a bowl at the SCG today! An amused Ravi Ashwin talks us through his skipper's spell #CAXIvIND pic.twitter.com/Whtx7S9GSq
— cricket.com.au (@cricketcomau) November 30, 2018
कोहलीने या सामन्यातील तिसऱ्या दिवशी दोन आणि चौथ्या दिवशी पाच असे एकूण 7 षटके गोलंदाजी केली आहे. विराटने त्याच्या सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आॅस्ट्रेलिया एकादश संघाकडून शतकी खेळी करणाऱ्या हॅरि निल्सेनची विकेट घेतली.
विराटच्या गोलंदाजीवर निल्सनने मिड-आॅनला असणाऱ्या उमेश यादवकडे सोपा झेल देत विकेट गमावली. या विकेटनंतर विराटने जोरदार सेलिब्रेशन केले होते.
Virat Kohli's hilarious reaction to wicket https://t.co/SCzRKso7Fg
— Bishwa Mohan Mishra (@mohanbishwa) December 1, 2018
विराटच्या या गोलंदाजीबद्दल आर अश्विन म्हणाला, ‘मला वाटते त्याला फक्त काही षटके गोलंदाजी करायची होती. कारण गोलंदाज थकले होते आणि दुसरा नवीन चेंडू खेळण्यासाठी उपलब्ध व्हायचा होता.’
भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथे 6 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एमएस धोनीला असा डान्स करताना पाहिले आहे का?
–हॉकी विश्वचषक २०१८: आज फ्रान्स विरुद्ध स्पेन संघात पहिला विजय मिळवण्यासाठी रंगणार चुरस