भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या गेलेला तिसरा कसोटी सामना अनेक कारणांनी चर्चेत राहिला. मात्र या सामन्यात काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी जे वर्तन केले. त्यामुळे जगभरात यावर टीका केली जात आहे. हा सामना बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या एका समूहाने मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर वर्णभेदी टिपणी केली होती. त्यांनंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेविड वॉर्नरने या प्रकरणाबद्दल त्या प्रेक्षकांची निंदा केली. तो म्हणाला प्रेक्षकांकडून अशा प्रकारच्या वर्तनाची अपेक्षा नव्हती. त्याचबरोबर त्याने सिराज आणि भारतीय संघाची माफी मागितली.
पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेलेल्या मोहम्मद सिराजला आणि जसप्रीत बुमराह यांना सलग दोन दिवस ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या वर्णभेदी टीकेचे शिकार व्हावे लागले. त्याचबरोबर चौथ्या दिवशी या कारणामुळे अजिंक्य रहाणेने पंचाकडे तक्रार करून काही वेळासाठी खेळ थांबवला होता. त्यानंतर काही प्रेक्षकांना स्टेडियममधून बाहेर हाकलून देण्यात आले. त्याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माफी सुद्धा मागितली.
यानंतर तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर डेविड वॉर्नरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करताना लिहिले, ” मला मोहम्मद सिराज आणि भारतीय संघाची माफी मागायची आहे. वर्णभेद करणे हे गैरवर्तन असून, ते कधीच स्विकारले जाऊ शकत नाही. अपेक्षा आहे की पुढील वेळेस प्रेक्षक चांगले वर्तन करतील.” दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यासाठी डेविड वॉर्नर मुकला होता. त्यानंतर सिडनीत पुनरागमन केल्यानंतर तो म्हणाला मैदानावर पुनरागमन केल्याने चांगले वाटले.
https://www.instagram.com/p/CJ7lbFCLT5e/?igshid=tde11a1oouou
डेविड वॉर्नरला म्हणाला,” पुनरागमन करणे खूप चांगले होते. सामन्याचा निकाल असा अपेक्षित नव्हता. जसा आम्हाला हवा होता. परंतु हेच कसोटी क्रिकेट आहे. पाच दिवस आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. मात्र भारताचे अभिनंदन. ज्यांनी शानदार पुनरागमन केले. या कारणामुळे आम्हाला क्रिकेटबद्दल एवढे प्रेम आहे. हा सोपा खेळ नाही. परंतु आता ब्रिस्बेन येथे होणार्या निर्णायक चौथ्या कसोटीवर नजरा आहेत आणि त्याठिकाणी खेळण्यात वेगळीच मजा आहे. ”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे तिसरा कसोटी खेळण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारताला विजयासाठी 407 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 131 षटकांत 5 गडी गमावून 334 धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने हा सामना अनिर्णीत राखला. या सामन्यात भारताकडून आर अश्विन आणि हनुमा विहारी यांनी झुंजार नाबाद खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना अनिर्णीत करण्यात यश मिळाले. तत्पूर्वी रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी भारतीय संघासाठी अनुक्रमे 97 आणि 77 धावा करून महत्त्वाचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…तर सिडनी कसोटी नक्कीच जिंकली असती’, हनुमा विहारीने व्यक्त केल्या भावना