भारतीय संघाने नागपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मालिकेतील अद्याप केवळ एकच सामना झाला असताना, मालिकेतील तिसऱ्या सामन्याचे स्थळ बदलण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे.
नागपूर येथे झालेला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने आपल्या नावे केला. त्यानंतर उदय संघातील दुसरा सामना दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडियम येथे खेळला जाईल. 17 फेब्रुवारीपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून धर्मशाला येथे तर अखेरचा सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथे खेळण्याचे नियोजित आहे.
मात्र, या नियोजित वेळापत्रकात आता बदल होण्याची शक्यता आहे. तिसरा सामना ज्या धर्मशाला येथील स्टेडियमवर होणार होता, तो सामना आता इतरत्र खेळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. धर्मशाला येथे हिमाचल प्रदेश राज्य क्रिकेट संघटनेचे आंतरराष्ट्रीय मैदान आहे. बर्फवृष्टीच्या हंगामात तेथे मोठ्या प्रमाणात बर्फ पडल्याने मैदानाचा काही भाग खराब झालेला. याच कारणाने हिमाचल प्रदेश संघाचे रणजी सामने देखील इतरत्र खेळवण्यात आलेले.
सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, मैदानाचा काही भाग खराब झाला आहे. तसेच, खेळपट्टीची देखील अद्याप चाचणी झालेली नाही. त्यामुळे या मैदानावर हा सामना होण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआयने त्याबद्दलच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हा सामना धर्मशाला येथे न झाल्यास इंदोर, मोहाली व राजकोट यापैकी एका मैदानावर होऊ शकतो. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही.
(India vs Australia Dharmshala Test Might Be Shifted Due To Bad Ground)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तानला धूळ चारणार का? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते