भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (29 नोव्हेंबर) दुसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पंड्याला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. पंड्याने खास योजनेसह गोलंदाजी केली, त्यामुळे इतर भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत तो यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हार्दिकची योजना यशस्वीपणे अंमलात आणली, याबद्दल ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने खुलासा केला आहे.
दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करत अवघ्या 25 षटकांत धावसंख्या 150 पार केली. एवढेच नव्हे, तर ते खेळपट्टीवर टिकून खेळण्यातही यशस्वी ठरले.
भारतीय गोलंदाज निष्फळ ठरत असतानाच कर्णधार विराट कोहलीने अष्टपैलू हार्दिक पंड्याला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला.
इतर भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत, पंड्याने संथ गतीने गोलंदाजी केली. त्याची ही योजना यशस्वी ठरली आणि शतकवीर स्टीव्ह स्मिथला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. याचबरोबर पंड्याला गोलंदाजी देण्याचा निर्णयही सार्थकी ठरला.
मात्र, ऑस्ट्रेलियाने दिलेले 390 धावांचे विशाल लक्ष्य गाठण्यात भारतीय संघाला यश आले नाही. या सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव झाला.
सामन्यानंतर बोलताना कर्णधार विराट कोहली म्हणाला की, “हार्दिकला गोलंदाजी देऊन आम्ही योजनेचा खुलासा केला.”
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचनेही विराटचे समर्थन केले. तो म्हणाला की, “पंड्याच्या गोलंदाजीमुळे आम्हाला ब्लुप्रिंट मिळाली. या खेळपट्टीवर संथ गतीच्या चेंडूवर धावा करणे अवघड होते. हार्दिकनेही संथ गतीने गोलंदाजी केली.”
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची प्रशंसा करताना फिंच म्हणाला की, “आमच्या फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. 300 च्या वर धावा केल्यास चांगलं वाटते. या विजयामुळे आनंदी आहे.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (2 डिसेंबर) होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
Video : लई भारी ! ऑस्ट्रेलियात घुमला छत्रपती शिवरायांचा जयघोष, तिरंग्यासोबत भगवाही झळकला
पॉवरप्लेमध्ये भारतीय गोलंदाजी पुन्हा ‘विकेटलेस’, सलग पाचव्यांदा दिल्या खोर्याने धावा
तिसर्या वनडेसाठी टीम इंडियामध्ये या ३ खेळाडूंना मिळू शकते संधी, तर खेळाडूंना मिळू शकतो डच्चू