भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची ऑस्ट्रेलियात दमदार फलंदाजी पाहून फक्त भारतीय चाहतेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नला सुद्धा वाटते आहे की या खेळाडूने आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असायला पाहिजे. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणार्या कसोटी मालिकेत त्याला भारतीय संघात स्थान दिलेले नाही.
भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूच्या रुपात आपली जागा निर्माण करणारा हार्दिक पंड्या सध्या गोलंदाजी करण्यासाठी तंदुरुस्त नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यात तो खासकरून फलंदाज म्हणून खेळला होता. परंतु कसोटी संघात तो गोलंदाजी करू शकत नाही म्हणून त्याची निवड केली नाही. आताच झालेल्या दुसर्या टी-20 सामना विजयी झाल्यानंतर या खेळाडूने आपली अपेक्षा व्यक्त केली होती की त्याला कसोटी संघाचा भाग असायला हवा होता आणि जर संघ व्यवस्थापकांची इच्छा असेल तर मी संघासोबत थांबायला तयार आहे.
शेन वाॅर्न यांनीही मांडले मत
तिसर्या टी-20 सामन्यात समालोचन करताना ऑस्ट्रेलियाचे माजी लेग स्पिनर शेन वॉर्न यांनी सुद्धा हे मत मांडले होते.
ते म्हणाले की, “हार्दिक पंड्या सारखा खेळाडू भारतीय कसोटी संघाचा भाग असायला पाहिजे होता.” शेन वॉर्नने समालोचन करतांना गमतीत म्हंटले होते की, “मी भारतीय क्रिकेट चाहत्यांना सल्ला देतो की त्यांनी हार्दिक पंड्याचा कसोटी संघात समावेश करण्यासाठी अर्ज करायला पाहिजे.”
समालोचनानंतर एका चाहत्यांने शेन वॉर्नकडे ट्विटरवर पंड्याबद्दल मत विचारले होते. या चाहत्याने शेन वॉर्न यांनी समालोचन करत असताना केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांची प्रतिक्रिया विचारली होती.
शेन वॉर्नने ट्विटरवर याचे उत्तर देताना लिहिले की,” त्याने हे (चाहत्याने अर्ज करावा) करायला पाहिजे. हार्दिक पंड्याला कसोटी संघात असायला हवे. त्याच्या जवळ खेळाडूंमध्ये ऊर्जा भरण्याची क्षमता आहे आणि त्याच्या उपस्थित असण्याने संघात सकारात्मक राहते. क्रिकेटला त्याच्या सारख्या भूमिकेची आणि सुपरस्टार खेळाडूची गरज आहे.”
संबंधित बातम्या:
– दिलदार पंड्या! स्वतःला मिळालेला मालिकावीराचा पुरस्कार दिला नटराजनला
– चार महिन्यांपासून मुलाचं तोंड नाही पाहिलं; सामनावीर पुरस्कार पटकावणारा पंड्या भावूक
– बिग ब्रेकिंग! भारताचा दिग्गज खेळाडू पार्थिव पटेल याची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती