---Advertisement---

मेलबर्न कसोटीपूर्वी आयोजक चिंतेत; खेळपट्टीचे नाही करता येणार परीक्षण

On: शुक्रवार, नोव्हेंबर 20, 2020 4:36 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटा सामना ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी होणार असल्याने; ती कसोटी ‘बॉक्सिंग डे’ कसोटी म्हणून ओळखली जाईल. मात्र, या बॉक्सिंग डे कसोटीआधी आयोजक काहीशे चिंतेत पडले आहेत. कारण, मुख्य सामन्यावेळी वापरल्या जाणाऱ्या ‘ड्रॉप-इन’ खेळपट्टीचे परीक्षण करण्याची संधी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या (एमसीजी) मैदान कर्मचार्‍यांना मिळणार नाही.

कोविड-१९ मुळे रद्द करण्यात आला सराव सामना

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचे प्रमुख स्टुअर्ट फॉक्स यांनी सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “दुसऱ्या कसोटीपूर्वी आम्ही चिंतेत आहोत. कारण, सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ड्रॉप-इन’ खेळपट्टीचे परीक्षण आम्हाला करता येणार नाही. आमची इच्छा होती की, त्या खेळपट्टीवर एक सराव सामना व्हावा. क्रिकेट विक्टोरिया यांनीदेखील त्या खेळपट्टीवर एक सामना खेळण्याची परवानगी दिली होती. मात्र, कोविड रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने, पूर्वनियोजित दोनदिवसीय सामना आता रद्द करण्यात आला आहे.”

मेलबर्नमध्ये वाढतेय कोविड रुग्णांची संख्या

मेलबर्न शहरात कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये मागील काही दिवसात वाढ झाली आहे. त्यामुळे मेलबर्नमधील शेफील्ड शिल्ड या प्रथमश्रेणी स्पर्धेचे सामने ऍडलेड येथे हलवण्यात आले होते. या सर्व घडामोडीतही, पुढील आठवड्यात एक दोनदिवसीय सामना एमसीजीवर खेळवण्यात येणार होता. मात्र, आता तो सामना रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

एमसीजीवर केला जातो ‘ड्रॉप-इन’ खेळपट्ट्यांचा वापर

एमसीजीवरील सामन्यांसाठी गेल्या काही वर्षापासून ‘ड्रॉप-इन’ खेळपट्ट्या वापरण्यात येत आहेत. मैदानाच्या बाहेर या खेळपट्ट्या बनवून, त्या मैदानावर बसविण्यात येतात. मुख्य सामन्याच्या काही दिवस आधी या खेळपट्ट्या मैदानावर बसवून, त्यावर परीक्षणासाठी एक किंवा दोन सामने खेळवले जातात. सर्वप्रथम अशा प्रकारच्या ‘ड्रॉप-इन’ खेळपट्ट्यांचा वापर न्यूझीलंडमध्ये करण्यात आला होता.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेने सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर, तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. दौऱ्याच्या अखेरीस चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘असं पुन्हा कधीही होणार नाही’, असा संदेश देत जेव्हा सचिनने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाला दिला होता ऑटोग्राफ

विराट-स्मिथची नजर सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमावर, कोण मारणार बाजी?

भारताकडे बुमराह आणि शमी असेल, तर आमच्याकडे कमिन्स, स्टार्क आहेत, पाहा कोण म्हणतंय 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---