---Advertisement---

असा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज!

---Advertisement---

उद्यापासून(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता विशाखापट्टणम येथे होणार आहे.

या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याने जर या सामन्यात 2 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 50 विकेट्स घेण्याचा टप्पा पार करेल.

तसेच हा टप्पा पार करणारा तो दुसराच भारतीय गोलंदाज ठरेल. याआधी भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने हा टप्पा गाठला आहे. अश्विनने टी20 मध्ये 46 सामन्यात 52 विकेट्स घेतले आहे.

याबरोबरच जर बुमराहने हा टप्पा उद्याच्याच सामन्यात पार केला तर तो टी20 मध्ये भारताकडून सर्वात जलद 50 विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरेल. अश्विनने 42 सामन्यात 50 विकेट्सचा टप्पा गाठला होता.

बुमराहने आत्तापर्यंत 40 सामन्यात 20.47 च्या सरासरीने 48 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच युजवेंद्र चहललाही हा पराक्रम करण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्याला 5 विकेट्सची गरज आहे. चहलने 29 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 45 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

52 – आर अश्विन (46 सामने)

48 – जसप्रीत बुमराह (40 सामने)

45 – युजवेंद्र चहल (29 सामने)

36 – भुवनेश्वर कुमार (37 सामने)

36 – हार्दिक पंड्या (38 सामने)

35 – कुलदीप यादव(18 सामने)

महत्त्वाच्या बातम्या- 

किंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास!

पहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया

हिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment