ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत प्रामुख्याने लक्ष असेल ते दोन्ही संघातील वेगवान गोलंदाजांवर. ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जॉश हेजलवूड यांसारखे दिग्गज गोलंदाज आहेत, तर भारताकडे देखील मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांची तिकडी आहे. सोबतच नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांचा पर्यायही आहे. ऑस्ट्रेलियामधील खेळपट्टी गोलंदाजांना मदतगार ठरत असते. मात्र, अशा परिस्थितीत गोलंदाजनी जास्त उताविळपणा दाखवू नये, असे सूचक विधान दिग्गज खेळाडू व भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी केले आहे.
आपल्या ताकदीप्रमाणे गोलंदाजी करावी
एका कार्यक्रमात बोलताना कपिल देव यांनी भारतीय गोलंदाजांना मोलाचा सल्ला दिला आहे. कपिल देव यांनी म्हटले की, “भारतीय गोलंदाजांनी जी आपली ताकद आहे त्याच प्रमाणे गोलंदाजी करावी. ऑस्ट्रेलियामध्ये गोलादाजांना चांगला बाऊन्स मिळतो व अशा वेळी गोलंदाज जास्त उत्तेजित होतात. गोलंदाजांनी या बाबत सावधगिरी बाळगायला हवी.”
भारताला १९८३ विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देव यांनी गुलाबी चेंडूत होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे मत मांडले आहे. कपिल देव यांच्या मते भारताकडे उत्तम गोलंदाज आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडे आपल्या देशातील परिस्थितीत खेळण्याचा जास्त अनुभव आहे. तसेच दिवस- रात्र कसोटी सामने खेळण्याचा देखील ऑस्ट्रेलियाकडे जास्त अनुभव आहे.
भारताने केवळ एकच दिवस- रात्र कसोटी सामना खेळलेला आहे. जर हा दिवस- रात्र कसोटी सामना भारतात झाला असता, तर मी भारतीय संघ ८०% सामना जिंकेल, असे म्हणालो असतो. पण विदेशात खेळणे अधिक आव्हानात्मक असेल, असेही कपिल देव म्हणाले.
दरम्यान १७ तारखेपासून सुरू होणाऱ्या दिवस- रात्र कसोटी सामन्याची सर्व तयारी जोरदार सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाज लवकर गुडघे टेकतात,’ ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटूचे रोखठोक मत
लंका प्रीमियर लीगमधील अंतिम सामन्याची संपूर्ण माहिती, जाणून घ्या एका क्लिकवर
नववर्षात वेस्ट इंडिज करणार बांगलादेशचा दौरा, ‘या’ कारणामुळे टी२० मालिका रद्द
ट्रेंडिंग लेख-
पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून कोण करणार ओपनिंग?, विराट समोर ‘हे’ ५ पर्याय
नव्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीयांची बल्ले-बल्ले; सहा खेळाडू ‘टॉप टेन’मध्ये