ऑस्ट्रेलियामधील खेळपट्ट्या विरोधी संघाला नेहमीच आव्हान देत आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही खेळपट्टी एक मोठे संकट ठरले आहे.
अॅडलेड येथील खेळपट्टी धीम्यागतीची होती तर पर्थची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी लाभदायक होती. मात्र मेलबर्नची खेळपट्टी फ्लॅट असून येथे याआधी झालेले पाचही प्रथम श्रेणीचे सामने अनिर्णीत राहिले आहेत.
याच मैदानावर मार्कस हॅरीसने नाबाद 250 धावा केल्या. ज्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया संघात भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी स्थान मिळाले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
“यावर्षात ही खेळपट्टी चांगली राहिली आहे. यावर अधिक विकेट्स मिळण्याची शक्यता आहे. जसे शिल्ड गेम्सच्या सुरूवातीच्या दोन सामन्यात झाले”, असे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पीटर सिडल म्हणाला. तो शेफिल्ड शिल्डमध्ये विक्टोरिया संघाकडून खेळत आहे.
या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया कदाचित पीटर हँड्सकॉम्ब ऐवजी मिशेल मार्शला अंतिम 11 जणांमध्ये घेऊ शकतो.
मागच्या वर्षी या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या अॅशेसचा चौथा सामना अनिर्णीत राहिला होता. या सामन्यानंतर आयसीसीचे रेफ्री रंजन मोदुगले यांनी निकृष्ठ करार दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–एकवेळ टीम इंडियाला धू-धू धूणारा फलंदाज घेतोय सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास
–आयपीएल- एकवेळ दिल्ली गाजवलेला खेळाडू आता मुंबईच्या ताफ्यात
–Video: चेंडू स्टेडियमच्या छताला लागला म्हणून फलंदाजाला दिला षटकार