---Advertisement---

‘त्यांनी ठिणगी पेटवली, आता मजा येईल…’, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ‘कांगारूं’ना अश्विनचे प्रत्युत्तर

On: शनिवार, फेब्रुवारी 4, 2023 5:40 PM
R-Ashwin
---Advertisement---

भारतीय क्रिकेटप्रेमी आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरुवात होणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातून भारतात येण्यापूर्वी स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांनी भारतात सरावासाठी मिळणाऱ्या खेळपट्ट्यांना उद्देशहीन म्हटले होते. तसेच, माजी खेळाडू इयान हिली यांनी बीसीसीआयवर निशाणा साधत ‘विश्वासघात’ करण्याचे भाष्य केले होते. अशात भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू आर अश्विन याने या आरोपांवर जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.

आर अश्विन (R Ashwin) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेपूर्वी इयान हिली (Ian Healy) यांच्या वक्तव्याबद्दल भाष्य केले. तो म्हणाला की, “हिली यांनी वक्तव्य केले की, भारतीय संघाला असे वाटते की, ऑस्ट्रेलियाला इथे येऊन चांगले वाटले नाही पाहिजे. त्यांना वाटते की, सराव सामन्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळपट्टी ऑस्ट्रेलियाला दिली जाईल. मला असे वाटते की, या वक्तव्यामुळे ठिणगी पेटली आहे.”

पुढे बोलताना अश्विन म्हणाला की, “ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आहे. आपल्याला अशीच ठिणगी हवीये मित्रांनो. आपण पाहिलंय की, स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यांनीही काही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता मजा येईल.” आपल्या युट्यूबवर बोलताना अश्विन म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाने सराव सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तान दौऱ्यावरही असेच केले होते. तुम्हाला कोणत्याही मालिकेसाठी परदेशात जास्त काळ राहिलेदेखील नाही पाहिजे. यामुळे थकवा येतो.”

गाबासारखी खेळपट्टी देण्याचा लावलेला आरोप
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने भारतात सराव सामने न खेळण्याच्या प्रश्नावर म्हटले होते की, “तिथे सराव सामने आणि वास्तवात सामना खेळताना मिळणाऱ्या खेळपट्ट्या वेगळ्या असतात. त्यामुळे त्यावर खेळण्याचा अर्थ नाहीये.” त्याने आरोप लावला की, “जेव्हा आम्ही भारतात कसोटी खेळतो, तेव्हा खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल असू शकते. मात्र, सराव सामन्यात उतरल्यावर आम्हाला गाबासारखी हिरवी खेळपट्टी देतात. याचा अर्थ काय आहे?”

याव्यतिरिक्त माजी यष्टीरक्षक इयान हिली यांनी म्हटले होते की, “आम्ही यजमान संघाकडून ज्या सुविधा मागितल्या आहेत, तशाच सुविधा पुरवल्या जातील, यावर विश्वास नाहीये. मी सराव आणि वास्तविक सामन्यांसाठी वेगवेगळ्या खेळपट्ट्या तयार करण्यावर खुश नाहीये. कारण, हे विश्वासघात केल्यासारखे आहे.”

भारताचे वर्चस्व
भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भारताचेच वर्चस्व जास्त आहे. भारतीय संघाने 2012नंतर आपल्याच देशात दमदार कामगिरी केली आहे. तसेच, भारतात ऑस्ट्रेलियाने 2004नंतर एकही मालिका जिंकली नाहीये. अशात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत कोण विजय मिळवतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (india vs australia r ashwin gave an interesting reply to the australian team read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी क्रिकेटरला झालंय तरी काय? विराटनंतर ‘या’ भारतीयाविषयी गरळ ओकत म्हणाला, ‘आमच्याकडे चिक्कार…’
‘या’ तारखेपासून सुरू होतेय महिला प्रीमिअर लीग, पहिल्या सामन्यात अंबानी- अदांनींचे संघ भिडणार एकमेकांशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---