पाकिस्तानचा खेळाडू सोहेल खान याने नुकतेच भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्याविषयी वक्तव्य केले होते. त्यामुळे तो भलताच चर्चेत आला होता. त्याने विराटच्या सुरुवातीच्या काळात त्याला कशाप्रकारे सुनावले होते, त्याबाबत भाष्य केले होते. त्यानंतर आता सोहेलने एका भारतीय वेगवान गोलंदाजाविषयी वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, त्याच्यासारखे गोलंदाज पाकिस्तानच्या डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये भरपूर आहेत.
सोहेल खान (Sohail Khan) ज्या भारतीय गोलंदाजाविषयी बोलत आहे, तो गोलंदाज इतर कुणी नसून उमरान मलिक (Umran Malik) आहे. उमरानला ‘वेगाचा बादशाह’ म्हणूनही ओळखले जाते. त्याने त्याच्या वेगवान गोलंदाजीने जगभरातील दिग्गज खेळाडूंचे लक्ष वेधले आहे. तो त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी चांगलाच चर्चेत असतो. एकीकडे सर्वजण त्याची प्रशंसा करत आहेत, तर दुसरीकडे सोहेलने त्याच्याविरुद्ध गरळ ओकली आहे.
काय म्हणाला सोहेल?
एका पॉडकास्टमध्ये बोलताना सोहेल म्हणाला की, “मला वाटते की, उमरान मलिक हा चांगला गोलंदाज आहे. मी 1-2 सामने पाहिले आहेत. तो जोरात धावतो आणि इतर गोष्टींवरही काम करतो. मात्र, जर तुम्ही ताशी 150-155 किमीच्या गतीने गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाजांबद्दल विचार करता, तेव्हा मी आणखी 12-15 खेळाडूंबद्दल सांगू शकतो. जे टेप-बॉल क्रिकेट खेळतात. जर तुम्ही लाहोर कलंदर्सने आयोजित केलेल्या शिबिरात गेलात, तर तुम्हाला अनेक खेळाडू मिळतील.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “याच्यासारखे तर भरपूर आहेत. आमच्या घरगुती क्रिकेटमध्ये असे गोलंदाज भरपूर पडून आहेत. जेव्हा एक गोलंदाज आमच्या घरगुती क्रिकेटमध्ये येतो, तेव्हा तो एक विश्वासू गोलंदाज बनतो. शाहीन, नसीम शाह, हॅरिस रौफ यांसारखे. हे असे गोलंदाज आहेत, ज्यांना त्यांचे काम माहिती आहे. मी तुम्हाला अनेक नावे देऊ शकतो.”
उमरान मलिक मोडू शकतो अख्तरचा विक्रम
उमरान मलिक याने नुकतेच श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यात खेळताना ताशी 156-157 किमीच्या गतीने चेंडू टाकला होता. त्यानंतर असे म्हटले जाऊ लागले की, आगामी काळात तो जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने चेंडू फेकणाऱ्या शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याचा विक्रम मोडू शकतो. अख्तरच्या नावावर ताशी 161.3 किमीच्या गतीने चेंडू फेकण्याचा विक्रम आहे. मात्र, सोहेलला वाटते की, शोएबचा हा विक्रम फक्त बॉलिंग मशीनच मोडू शकते.
तो म्हणाला की, “फक्त एक गोष्ट आहे, जी शोएब अख्तरचा विक्रम मोडू शकते. ती गोष्ट आहे, बॉलिंग मशीन. कारण, कोणताही व्यक्ती कधीही असे करू शकत नाही. कारण, शोएबने जितकी मेहनत घेतली आहे, तितकी इतर कुणीही घेतली नाहीये. तो एका दिवसात 32 फेऱ्या मारायचा. मी एका आठवड्यात 10 फेऱ्या मारायचो. तो त्याच्या पायांना वजन बांधून टेकड्यांवर धावायचा.”
असे असले, तरीही उमरानचा वेग हा कोणत्याही गोलंदाजाला धडकी भरवणारा आहे. त्यामुळे आगामी काळात उमरान अख्तरचा विक्रम मोडतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (sohail khan targets indian speedster umran malik know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ तारखेपासून सुरू होतेय महिला प्रीमिअर लीग, पहिल्या सामन्यात अंबानी- अदांनींचे संघ भिडणार एकमेकांशी
सानिया मिर्झानंतर शोएब मलिकही घेतोय निवृत्ती? मैदानात मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’