भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसर्या वनडे सामन्यात दमदार अर्धशतक ठोकले. या डावखुर्या फलंदाजानी 43 चेंडूत आपले अर्धशतक झळकावल्या नंतर पुन्हा एकदा बॅटला तलवारीसारखे फिरवून अर्धशतकाचा आनंद साजरा केला. जडेजाने आपल्या 50 चेंडूच्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार लगावत नाबाद 66 धावांची महत्त्वाची खेळी केली.
सातव्या क्रमांकावर येत ठोकले नाबाद अर्धशतक
सातव्या क्रमांकावर जडेजा फलंदाजीला आला, तेव्हा भारतीय संघाची स्थिती खराब होती. भारताने त्यावेळी विराट कोहलीच्या (66) रूपाने पाचवी विकेट संघाच्या 152 धावसंख्येवर गमावली होती. परंतु, यांच्यानंतर जडेजाने हार्दिक पंड्याच्या सोबत मिळून शेवटच्या 18 षटकात अत्यंत गरजेच्यावेळी 150 धावा जोडल्या. जडेजाने त्याच्या अर्धशतकाच्या दरम्यान 7 चेंडूत 30 धावा काढल्या होत्या.
सीन अबाॅटची जडेजा कडून जोरदार धुलाई
त्यानी मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करताना खासकरून सीन अबाॅटच्या गोलंदाजीवर जोरदार धुलाई केली.
आपले अर्धशतक पूर्ण करताच एक बार पुन्हा तलवार फिरवण्याच्या अंदाजात आपली बॅट फिरवून चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला.
https://twitter.com/N1rAhuL__/status/1334033223580602368
— INNINGS BREAK —
Hardik Pandya ➞ 92*
Ravindra Jadeja ➞ 66*India score 7️⃣6️⃣ runs in the last 5️⃣ overs to post 302/5 💥
Follow #AUSvIND 👉 https://t.co/UpvjQhWPfW pic.twitter.com/R5BoGU77On
— ICC (@ICC) December 2, 2020
Sir Ravindra Jadeja today:
66*(50) with bat ✔️
10-0-62-1 with ball ✔️
01 outstanding catch ✔️Complete All-round performance#AUSvsIND #TeamIndia #Cricket pic.twitter.com/cQRhSOyhIZ
— SportsTelugu (@telugu_sports) December 2, 2020
या वर्षातील जडेजाचे दुसरे अर्धशतक
जडेजाने यंदा दुसर्यांदा अर्धशतकी खेळी साकारली. तो यंदाच्या वर्षातील 9 वा वनडे सामना खेळत होता आणि त्याने सातव्या डावात दुसरे अर्धशतक झळकावले.
महत्त्वाच्या बातम्या-
पंड्या-जडेजा जोडीची कमाल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध दीडशतकी भागीदारी करत मोडला १० वर्षापूर्वीचा रेकॉर्ड
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई