नवी दिल्ली | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माची दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवड झालेली नाही. त्यामुळे तो या मालिकेचा भाग नव्हता. मात्र, वनडे मालिकेला मुकल्यानंतरही त्याने एक खास विक्रम नोंदवला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका यावर्षीची भारतीय संघाची शेवटची वनडे मालिका ठरली आहे. त्यामुशे रोहितने 19 जानेवारी 2020 रोजी बेंगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात केलेली 119 धावांची खेळी ही यावर्षी भारतीय खेळाडूने वनडे क्रिकेटमध्ये केलेली सर्वोच्च धावांची खेळी ठरली आहे.
वास्तविक, कोणत्याही भारतीय फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या वनडे मालिकेत शतक ठोकले नाही. भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने मालिकेतील शेवटच्या वनडे सामन्यात 92 धावांची खेळी केली. ही या मालिकेतील भारतीय खेळाडूने केलेली सर्वाधिक धावांची खेळी ठरली.
वनडे मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारपासून (4 डिसेंबर) तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होईल आणि त्यानंतर 17 डिसेंबरपासून 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
रोहित शर्माची कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. आगामी कसोटी मालिकेत तो कशी कामगिरी करतो ते पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“आदर हवा असेल तर तो करायलाही शिका”, युवा गोलंदाजाचे आफ्रिदीला जोरदार प्रत्युत्तर
‘याला कोणीतरी चांगले बूट घेऊन द्या रे’, केएल राहुलची उडवली जातेय खिल्ली