नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर दौर्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
या दौर्यावर भारताला चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळायचे आहेत. वेळापत्रकानुसार भारत ऍडलेडमध्ये दिवस- रात्र कसोटी सामना खेळेल. या दौर्याची सुरुवात वनडे सामन्याने होईल. हे तीनही वनडे सामने 27 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर रोजी खेळले जातील.
तीन टी20 सामने ४, ६ आणि ८ डिसेंबर रोजी खेळले जातील. पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून सुरू होईल. मेलबर्नमध्ये दोन्ही संघ बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळतील.
बीसीसीआयचे मानले आभार
वेळापत्रक जाहीर करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, “भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिन्ही स्वरूपात जोरदार टक्कर पाहायला मिळते. आम्ही ऑस्ट्रेलियातील उष्ण वातावरणात विराट कोहली आणि त्याच्या संघांचे स्वागत करतो. हा दौरा गेल्या काही महिन्यांत यशस्वी करण्यासाठी आम्ही बीसीसीआयबरोबर काम केले आहे. आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत. सर्वप्रथम, खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आम्ही सरकारसोबत जुळून कार्य करत आहोत आणि त्यांच्या प्रोटोकॉल आणि नियमांनुसार, वेळापत्रक जारी केले गेले आहे.”
भारत अ संघ करेल ऑस्ट्रेलियाचा दौरा
कसोटी मालिकेनंतर भारत अ संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. यावेळी, दोन्ही संघांमधील डे-नाईट कसोटी सामना 11 ते 13 डिसेंबर दरम्यान सिडनी येथे खेळला जाईल. सोमवारी बीसीसीआयने या दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. युएईमध्ये नसलेले व संघात निवडलेले प्रशिक्षक व खेळाडू लवकरच 10 नोव्हेंबरला आयपीएल संपल्यानंतर यूएईला रवाना होतील. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह चार्टर्ड विमानातून सिडनी येथे दाखल होतील.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांचे वेळापत्रक
पहिला वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वनडे -02 डिसेंबर – कॅनबेरा
पहिला टी 20 – 04 डिसेंबर – कॅनबेरा
दुसरा टी 20 – 06 डिसेंबर – सिडनी
3 रा टी 20 – 08 डिसेंबर – सिडनी
पहिला कसोटी सामना – 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर – ऍडिलेड
दुसरा कसोटी सामना – 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – 07 जानेवारी ते 11 जानेवारी – सिडनी
चौथा कसोटी सामना – 15 जानेवारी ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
महत्त्वाच्या बातम्या-
-चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! भारत-ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सामन्याचा घेऊ शकतात प्रत्यक्ष आनंद
-ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच टीम इंडियाच टेन्शन वाढलं ; ‘या’ व्यक्तीला झाली कोरोनाची लागण
-आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल
ट्रेंडिंग लेख-
-…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
-चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे
-अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…