आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्व साखळी सामने खेळून झाले आहेत. अशात हा विश्वचषक अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ केपटाऊन येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार 6.30वाजता एकमेकांना भिडणार आहेत. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतासाठी हा सामना ‘करो या मरो’ असणार आहे. मागील 2020च्या विश्वचषकामध्ये उभय संघ अंतिम सामन्यात आमने-सामने होते, परंतु यावेळी ते उपांत्य सामन्यात एकमेकांचा सामना करत आहेत. भारतीय संघाला विरोधी संघाला पराभूत करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
महिला टी20 विश्वचषक 2023 (Womens T20 World Cup 2023) स्पर्धेत ऑस्ट्रेलिया महिला (Australia Women) संघाने चारही साखळी सामने जिंकत उपांत्य सामन्यात एन्ट्री केली आहे. तसेच, भारतीय महिला (India Women) संघाला इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलिया सातत्याने 22 सामन्यात विजय मिळवत आहे. या स्पर्धेतील हा एक शानदार विक्रम आहे. महिला टी20 विश्वचषकाचा हा 8वा हंगाम आहे. आधी 7 टी20 विश्वचषक पार पडलेत. त्यात 6 वेळा ऑस्ट्रेलिया संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे आणि सर्वाधिक 5 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मागील 3 वर्षात 2 वेळा अंतिम सामन्यात पराभूत केले आहे. सन 2020मध्ये ऑस्ट्रेलियाने टी20 विश्वचषकात भारताला पराभूत केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारताला पराभूत केले होते. अशात या दोन्ही पराभवाचा हिशोब बरोबर करण्यावर भारतीय संघाची नजर असेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 विश्वचषक आमने-सामने आकडेवारी
महिला टी20 विश्वचषकात दोन्ही संघ आतापर्यंत 5 वेळा एकमेकांना भिडले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 3 वेळा विजय मिळवला आहे, तर भारताच्या खात्यात 2 विजय पडले आहेत. सन 2020मध्ये दोन्ही संघ दोन वेळा एकमेकांना भिडले होते. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी विजय मिळवला होता, तर सिडनीमध्ये भारताने 17 धावांनी सामना खिशात घातला होता. सन 2018मध्ये भारताने 48 धावांनी विजय मिळवला होता, तर 2012 आणि 2010मध्ये ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे 8 आणि 7 विकेट्सने सामना खिशात घातला होता.
उपांत्य सामन्यात अशी असू शकते भारत-ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इलेव्हन (india vs australia semi final ICC womens t20 world cup know probabale playing xi and head to head stats)
भारत-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे, राधा यादव, रेणुका सिंग, राजेश्वरी गायकवाड.
ऑस्ट्रेलिया-
मेग लॅनिंग (कर्णधार), एलिस पेरी, ऍशले गार्डनर, एलिसा हिली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, तालिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेयरहम, डार्सी ब्राऊन, अलाना किंग, मेगन शट.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शोएब अख्तर 2002 सालीच बनला असता पाकिस्तानचा कर्णधार, पण कशात अडलं ते घ्या जाणून
INDw vs AUSw । फायनलमध्ये दोन पराभव आणि चिंताजनक आकडेवारी, भारतासाठी ऑस्ट्रेलियाचे आव्हान कठीणच!