दक्षिण आफ्रिकेत सध्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक खेळला जात आहे. या महिला टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना गुरुवारी (23 फेब्रुवारी) रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन तगड्या संघांमध्ये खेळला जाईल. केपटाउनच्या न्यूलॅड्स मैदानावर दोन्ही संघ आमने सामने असतील. ग्रुप बी मध्ये भारत दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया ग्रुप ए मध्ये पहिल्या स्थानावर होता. भारतीय संघासाठी उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियन संघावर मात करणे वाटते तितके सोपे नसेल.
ग्रुप स्टेजमध्ये हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने जिंकले, तर एका सामन्यात संघाला पराभव मिळाला. भारतीय संघाला ग्रुप स्टेजमध्ये एकमात्र इंग्लंड संघ पराभूत करू शकला. तसेच दुसरीकडे ऑस्ट्रेलियन महिला संघाने मात्र ग्रुप स्टेजमध्ये एकही पराभव स्वीकारला नाही. भारतीय संघाला उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया कडवे आव्हान देणार हे मात्र नक्की. दोन्ही संघामधील यापूर्वीची आकडेवारी पाहिली, तर त्यावरून हे लक्षात येते की, ऑस्ट्रेलियाचे पारडे भारतापेक्षा जड आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात आतापर्यंत 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी 22 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असून अवघ्या 7 सामन्यात भारतीय संघ जिंकला. राहिलेल्या एका सामन्याचा निकाल लागला नाही. असे असले तरी, भारतीय महिला संघानेही अनेकदा ऑस्ट्रेलियाला चांगली टक्का दिली आहे. मार्च 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 सामन्यात पारभूद झाल्यानंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये फक्त दोन वेळा पराभूत झाला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिययाने हे दोन्ही पराभव भारतासमोर स्वीकारले आहेत.
भारतीय महिला संघाने मागच्या तीन वर्षात ऑस्ट्रेलियासोबत खेळताना दोन अंतिम सामने गमावले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडू टी-20 विश्वचषक 2020 मध्ये आमने सामने आल्या होत्या. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारत 85 धावांनी पराभूत झाला होता. त्याव्यतिरित्क मागच्या वर्षी बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्सच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी भारताला मात दिली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा सामना डिसेंबर 2022मध्ये झाला होता. ऑस्ट्रेलियन संघ पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आलेला. या मालिकेत यजमान भारतताला 1-4 अशा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. अशात गुरुवारी होणारा विश्वचषकाचा उपांत्य सामना चांगलाच रोमांचक ठरू शकतो. (Australia will be a tough challenge for India in the semi-finals of the Women’s T20 World Cup 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘वॉर्नर खेळत नसला तरी संघाता त्याचा काही फरक पडत नाही…’, दिग्गजा फलंदाजाचे मोठे विधान
महिला प्रीमिअर लीगची चांदी! बीसीसीआयने टाटांकडे सोपवली ‘ही’ प्रचंड मोठी जबाबदारी