रविवारी(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विशाखापट्टणम येथे पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांच्यावर ट्विटरवर जोरदार टीका झाली आहे. या सामन्यात धोनीला 78.38 च्या स्ट्राइक रेटने 37 चेंडूत नाबाद 29 धावाच करता आल्या.
तर शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 14 धावांची गरज असताना उमेश यादवच्या गोलंदाजीवर पॅट कमिन्स आणि झाय रिचर्डसनने या 14 धावा करत ऑस्ट्रेलियाला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला. त्यामुळे अनेकांनी भारताच्या या पराभवासाठी या दोघांना जबाबदार धरले आहे.
असे असतानाच भारताचा नियमित सलामीवीर शिखर धवनही मागील दोन दिवसापासून ट्रोल होत आहे. त्याला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. त्याच्याऐवजी केएल राहुलला संधी देण्यात आली.
पण पहिल्या टी20 सामन्याच्या पूर्वसंधेला शिखरने त्याचा सरावानंतरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि त्याला कॅप्शन दिले होते की ‘उद्यासाठी सर्व तयारी झाली आहे.’
मात्र त्याला या सामन्यात 11 जणांमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला सामन्यावेळी डगआऊटमध्ये बसावे लागले. यावेळी धोनी फलंदाजी करत असताना त्याने बॅट बदलण्यासाठी यायला सांगितले, त्यावेळी धवन बॅट घेऊन मैदानात धावत आला.
धवनचा बॅट घेऊन मैदानात येतानाचा हा फोटो आणि त्याने सामन्याच्या आदल्यादिवशी पोस्ट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेक कमेंट केल्या जात आहेत.
मे महिन्यात विश्वचषक सुरु होणार आहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी जास्तीत जास्त खेळडूंना संधी देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापन प्रयत्न करत आहेत. त्याचमुळे
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात काही बदल करण्यात आले होते.
यामध्ये शिखरला विश्रांती देण्यात आली होती. तर उमेश यादवनेही बऱ्याच दिवसानंतर टी20 संघात पुनरागमन केले. त्याचबरोबर मयंक मार्कंडेला भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली.
@SDhawan25 was all set for this ???? #INDvAUS pic.twitter.com/8JHaiJ2qpk
— Punk (@punk_hardik) February 24, 2019
Yesterday and today! Sad dhawan life pic.twitter.com/ITcTmrtXh5
— ???????????????????????? ???????????????????????? (@famino__) February 24, 2019
Feeling Sad for him @SDhawan25
CC : @GurwinderKahlo6 #INDvAUS pic.twitter.com/KGFCPjBjtt
— Tanuj Birua (@supersonicbirua) February 24, 2019
India lost today because there was no Bhoomi Pujan done.. #INDvAUS #ShikharDhawan #Umesh #bumrah pic.twitter.com/LV7qQpR0iv
— Sir Pranks A Lot (@sauri_1211) February 24, 2019
Poor Shikhar Dhawan ???? #INDvAUS pic.twitter.com/X0i6nfTOIU
— CricBattle Fantasy (@CricBattle) February 24, 2019
Gabbar ???????? #INDvAUS pic.twitter.com/VxFTv4u89x
— . (@NOMANHAFEEZ2) February 24, 2019
When you know it's not your fault today #AUSvIND pic.twitter.com/tU774R6zsD
— Rishabh Srivastava (@AskRishabh) February 24, 2019
https://twitter.com/amateur_ape/status/1099737993340870656
महत्त्वाच्या बातम्या-
–हवाई दलाने दाखवलेल्या शौर्याला या दिग्गज क्रिकेटपटूंकडून सलाम
–जेव्हा किंग कोहली साजरा करतो त्याच्या बाॅडीगार्डचा वाढदिवस, पहा व्हीडिओ
–सुधर जाओ! विरेंद्र सेहवागच्या पाकिस्तानवरील त्या ट्वीटला ४ तासांत १८ हजार रिट्वीट






