---Advertisement---

टी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच

---Advertisement---

ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया बहुचर्चित दौऱ्यातील टी२० मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघ टी२० मालिकेत एकूण ३ सामने खेळणार आहे.

गेल्या १० वर्षांत आॅस्ट्रेलिया भारताविरुद्ध कधीही द्विपक्षिय टी२० मालिका जिंकली नाही. या टी२० मालिकेतही काही खास विक्रम होणार आहेत. त्यातील  निवडक विक्रम असे-

१५- आजपर्यंत भारत- आस्ट्रेलियात १५ टी२० सामने झाले असुन यातील १० सामने भारताने तर ५ आॅस्ट्रेलियाने जिंकले आहेत.

१- या दोन देशांत झालेल्या सामन्यातील एक सामना पावसामुळे वाया गेला आहे. हा सामना १३ आॅक्टोबर २०१७ रोजी हैद्राबादला खेळवला जाणार होता.

६- भारत आजपर्यंत आॅस्ट्रेलिया देशात ६ सामने खेळला असून यातील ४ सामने जिंकला आहे. तर दोन सामन्यात संघाला पराभव पहावा लागला आहे.

४२३- आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावा. विराटने ११ डावात फलंदाजी करताना ६०.४२च्या सरासरीने ह्या धावा केल्या आहेत.

३४२- भारताविरुद्ध खेळताना आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजाने केलेल्या धावा. ८ डावात त्याने ४२.७५च्या सरासरीने ह्या धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

पुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार

नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच

अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल

त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!

असे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले!

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment