सिडनी। भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे तो जेव्हाही मैदानात उतरतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघासमोर त्याला रोखण्याचे आव्हान असते. त्यासाठी अनेकदा संघ वेगळी तयारी करताना दिसतात.
त्याप्रमाणे 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाचा संघही तयारी करत आहे.
या तयारीमध्ये त्यांना क्रिकेट आॅस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणी एक वर्षाची बंदी घातलेला डेव्हिड वॉर्नर मदत करताना दिसून आले आहेत. तर स्टिव्ह स्मिथही मदत करणार असल्याचे वृत्त आहे.
हे दोघेही भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाहीत पण ते कोहलीला रोखण्यासाठी वेगवान गोलंदाजांना मदत करणार आहेत.
तसेच वॉर्नर रविवारी आॅस्ट्रेलियाच्या नेटमध्ये जॉस हेझलवूड आणि पॅट कमिन्स या गोलंदाजांना सराव देतानाही दिसून आला आहे. तो जेव्हा या दोन गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करत होता तेव्हा आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर हेही पंचाच्या जागी उभे राहुन त्याच्या सरावाकडे लक्ष देत होते.
Two of Australia's star quicks didn't hold back when David Warner jumped in the SCG nets this afternoon. pic.twitter.com/yyoUowozWP
— cricket.com.au (@cricketcomau) November 25, 2018
तसेच आॅस्ट्रेलियाच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार वॉर्नरला रविवारी भारताविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यातील पराभवानंतर आॅस्ट्रेलियाच्या ड्रेसिंगरुममध्येही बोलवण्यात आले होते.
त्याचबरोबर आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने माहिती दिली की स्मिथलाही या आठवड्यात गोलंदाजांच्या मदतीसाठी विचारण्यात आले आहे.
स्टार्क म्हणाला, कसोटीच्या तयारीसाठी त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे ही आमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. तो जगातील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करणे आमच्यासाठी फायदेशीर आहे.
स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावरील बंदी न उठवण्याचा निर्णय मागील आठवड्यात क्रिकेट आॅस्ट्रेलियाने घेतला आहे. त्यामुळे त्या दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी बंदीचे एक पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट जगातील १११७ खेळाडूंना ठरला भारी, जाणून घ्या काय आहे कारण
–सिक्युरीटी गार्डने पकडला कोहलीचा अफलातून षटकार, पहा व्हिडीओ
–कोहलीच्या झंझावातापुढे रोहितचा तो कारनामा कुणाच्या लक्षातही आला नाही