भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका आता संपली आहे. यानंतर आता ३ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळली जाणार आहे. अशामध्ये आता सर्वांच्या नजरा या भारतीय संघाच्या सलामी जोडीवर लागल्या आहेत. वनडे मालिकेच्या एकाही सामन्यात भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही. सलामीवीर शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये होता, परंतु दुसऱ्या बाजूने त्याला कोणीही चांगली साथ दिली नाही. अशामध्ये आता भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक सुनील गावसकर यांनी सलामी जोडीत बदल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी धवनसोबत कोणी फलंदाजी करावी हे सांगितले आहे.
काय म्हणाले गावसकर?
गावसकर यांनी तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर म्हटले की, “केएल राहुलने धवनसोबत सलामीला फलंदाजी केली पाहिजे. ६७० धावा ठोकत राहुलने आयपीएल २०२० मध्ये ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती, तर धवनने दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना ६१८ धावा केल्या होत्या. सध्या धवन टी२० क्रिकेटमध्ये चांगल्या लयीत दिसत आहे. १४ किंवा १५ व्या षटकापर्यंत तो टिकला, तर हार्दिक पंड्याने चौथ्या आणि पावर प्लेमध्ये २ विकेट्स गेल्या तर श्रेयस अय्यरने फलंदाजी केली पाहिजे.”
वनडेमध्ये सलामीवीर ठरले फ्लॉप
वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना मयंक अगरवालने केवळ २२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या वनडे सामन्यातही मयंक केवळ २८ धावाच करू शकला. त्यानंतर मात्र तिसऱ्या वनडेत युवा फलंदाज शुबमन गिल याला सलामीला फलंदाजीची संधी दिली. परंतु त्यालाही केवळ ३३ धावाच करता आल्या. मात्र, धवनने पहिल्या वनडेत ७४ धावांची जबरदस्त अर्धशतकी खेळी केली होती. साधारणत: सलामी करणाऱ्या राहुलला तिन्ही वनडे सामन्यांत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. त्या ठिकाणी तो फ्लॉप ठरला.
विराट कोणाला देणार संधी?
राहुलने टी२० क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करून आतापर्यंत ११ अर्धशतके ठोकली आहेत, तर टी२०त धवननेही आतापर्यंत १० अर्धशतके ठोकली आहेत. अशामध्ये आता विराट टी२० सामन्यांमध्ये सलामीला धवनसोबत कोणत्या फलंदाजाला संधी देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. टी२० क्रिकेटमध्ये मयंक अगरवालही आहे. मयंकनेही आयपीएलमध्ये ४२४ धावा ठोकत चांगली कामगिरी केली होती.
शुक्रवारी होणार टी२० मालिकेला सुरुवात
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील टी२० मालिकेला शुक्रवारपासून (४ डिसेंबर) कॅनबेरा येथे सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे ‘संपूर्ण वेळापत्रक’; पाहा कधी आणि कुठे होणार सामने
भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यात मैदान गच्च भरणार, सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव